किचनसाठी काही टीप्स

टीप्स – 

– बटाटे उकडताना ते धुवून घेऊन त्यांना टोचे मारून ५ मिनिटे मायक्रोवेव्ह मध्ये ठेवायचे. मधेमधे एकदा उलट-पालट करायचे. मग फ्रिजमध्ये ठेवून द्यायचे. गार झाले की सालं पटकन काढता येतात.

– पावभाजी करताना त्यात लाल भोपळा घातल्यास लहान मुलांना पावभाजी मसाल्याने होणारा त्रास होत नाही आणि भाजी छान मिळूनही येते.

– बदामाची सालं काढायला एका बशीत ते बुडतील इतक्या पाण्यात मिनिटभर मायक्रोवेव्हमध्ये ठेवायचे. आधी भिजवले नसले तरी मऊ होतात आणि सालं काढता येतात.

– पुरणात व्हॅनिला इसेन्सही चांगला लागतो. खास करुन जर कव्हरसाठी फक्त मैदा घेणार असाल तर हा इसेन्स घातला तर उत्तम.