जालन्यात येथे बैलगाडी विहिरीत पडून एकाचा मृत्यू

17


सामना प्रतिनिधी । जालना

तालुक्यातील नसडगांव येथे बैल बिथरल्याने बैलगाडी आवरली नाही, त्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीत बैलगाडी कोसळून पाण्यात बुडून सोपान बबनराव नागवे (32वर्षे, रा.डुकरी पिंप्री ता.जि.जालना) या तरूण शेतकर्‍याचा मृत्यू झाला.

मयत सोपान नागवे हे बैलगाडी घेवून शेतात जात होते. गट नंबर १९६ मधील प्रशांत देशमुख यांच्या शेतातील रोडच्या बाजुस असलेल्या विहिरीमध्ये  बैलगाडी विहिरीत पाण्यात पडली. त्यामध्ये बैलगाडीखाली दबून सोपान नागवे याचा मृत्यू झाला.  याबाबत योगेश पंडीतराव भुतेकर रा. नसडगांव ता. जालना यांच्या माहितीवरून मौजपुरी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस उपनिरीक्षक बिराजदार करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या