मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बस टेम्पोच्या अपघातात ३० प्रवासी जखम

सामना ऑनलाईन। पनवेल

पनवेलजवळील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भाताण गावाजवळ आज गुरुवारी पहाटे खासगी बस व टेम्पोला झालेल्या अपघातात सुमारे ३० प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झालेली नाही.

साई ट्रव्हल्सची बस(एमएच ०४ सीपी १०४८) पुण्याहून मुंबईला येत होती. ही बस भाताण गावानजीक आली, यावेळी मागून भरधाव वेगात येणाऱ्या एका टेम्पोने बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यात दोन्ही चालकांचे वाहनांवरील नियंत्रण सुटले व दोन्ही गाडय़ा रस्ता सोडून बाजूला असलेल्या नाल्याच्या दिशेने कलंडल्या. यात ३० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

दिवसेंदिवस मुंबई पुणे द्रुतमार्गावर अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने प्रवाशांनी चिंता व्यक्त केली आहे.