१ कोटी ४६ लाखांची बॅग बघितलीत का ?

सामना ऑनलाईन। लंडन

लंडनमध्ये झालेल्या लिलावात १० वर्षापूर्वीच्या हर्मेस बर्किन बॅगला २१७,१४४ डॉलर म्हणजेच १ कोटी ४६ लाख रुपये एवढी किंमत मिळाली आहे. एखाद्या बॅगला लिलावात करोडो रुपये किंमत मिळण्याची ही युरोपातील पहिलीच घटना आहे. यामुळे या बॅगने युरोपमध्ये रेकॉर्ड बनवला आहे.

या बॅगवर १८ कॅरेटचे व्हाईट गोल्ड डायमंड लावलेले आहेत. २००८ साली तयार करण्यात आलेल्या या बॅगची किंमत मंगळवारी १००,००० -१५०,०००  डॉलर एवढी झाली होती. याआधी २०१७ साली हाँगकाँगमध्ये याच कंपनीची एक बॅग ३८०,००० डॉलरला विकली गेली होती. दरम्यान,ही बॅग ३० सेमी रुंद व मध्यम आकाराची आहे. किम कर्दाशिया, व्हिक्टोरिया बेकहॅम यांच्यासह अनेक बड्या सेलिब्रिटीजची हर्मेस बर्किनच्या बॅगलाच पसंती असते. यामुळे धनाढ्य लोकांची बॅग असे या बॅगबाबत बोलले जाते.