जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा

सामना ऑनलाईन । जम्मू-कश्मीर

जम्मू-काश्मीरमध्ये हंदवाडा येथे रविवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलं आहे. सर्व हिंदुस्थानी जवान सुरक्षित असून रविवार पहाटेपासून ही चकमक सुरु आहे. लश्कर-ए-तोयबाचे तीन दहशतवादी हंदवाडा परिसरात लपून बसले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जैश-ए-मोहम्मदचे किमान दहा दहशतवादी हिंदुस्थानात शिरले असून ते मोठा हल्ला करणार आहेत. नगरोटा-जम्मू-पठाणकोट परिसराला लक्ष्य करणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.