बस पकडताना वरूण धवनची दमछाक

सामना ऑनलाईन । मुंबई

वरूण धवन ‘सुई धागा : मेड इन इंडिया’ या चित्रपटात भूमिका साकारत आहे. या चित्रपटात तो मौजी नावाच्या टेलरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा प्रवास गावातील बसमधून होतो. मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत राहलेल्या वरूणला या चित्रपटातील काही दृश्य चित्रीत करताना संकटांचा सामना करावा लागला. जीवनात कधीही न अनुभवलेल्या गोष्टी चित्रीत करताना अडचणी आल्याचे त्याने सांगितले. या चित्रपटाने आपल्याला अनुभवसंपन्न केले आहे असेही तो म्हणाला. या चित्रपटातील बस पकडण्याचे एक दृश्य चित्रीत करताना दमछाक झाल्याचे त्याने सांगितले.

अनेक लहानलहान गावात बस हेच परिवहनाचे एकमेव साधन असते. त्यामुळे या बस गर्दीने भरलेल्या असतात. अनेकदा गर्दीने खचाखच भरलेल्या बसमध्ये चढून जागा मिळवण्यासाठी धक्काबुक्की होते. एका दृश्यात अशीच गर्दीने भरलेली बस पकडण्याचे चित्रण करायचे होते. दिग्दर्शक शरत कटारिया यांना हे दृश्य रियल चित्रीत करायचे होते. त्यामुळे मला बसमध्ये चढू द्यायचे नाही अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यामुळे बस पकडताना सामान्य माणसांना किती अडचणींना सामोरे जावे लागते याची अनुभव मला आला. दिग्दर्शकांनी दिलेल्या सूचनांचे सर्वांनी पालन केल्याने मला बसमध्ये चढताच आले नाही. अनेकदा बस पकडताना मी खालीही पडलो. हे दृश्य चित्रीत करण्यासाठी मला 10 रिटेक घ्यावे लागले. अखेर गर्दीचा सामना करत धक्काबुक्की करत मी बस पकडली. दृश्य ओके झाल्यावर मला उलट्या सुरू झाल्या.त्यामुळे बस पकडणे किती जिकीरीचे असते ते मला समजले, असे वरूण म्हणाला.