ऑस्ट्रेलियातील हिंदुस्थानी दूतावासात सापडले संशयास्पद पाकिट


सामना ऑनलाईन। मेलबॉर्न

ऑस्ट्रेलियातील मेलबॉर्न येथे हिंदूस्थानी दूतावासासह अन्य आंतरराष्ट्रीय वाणिज्य दूतावासांमध्ये 10 संशयास्पद पाकिटं आढळल्याने खळबळ उडाली आहे. संशयास्पद पाकिटं आढळल्याचे वृत्त कळताच पोलीस व अग्नीशमन दलाने हिंदूस्थानी दूतावासात धाव घेतली. ऑस्ट्रेलियाच्या फेडेरल पोलिसांनी याबद्दल टि्वट केले असून त्यात दूतावासात सापडलेली संशयास्पद पाकिटं ताब्यात घेण्यात आली असून त्यांचा तपास करण्यात येत आहे. पोलीस व आपालकालीन पथक पुढील तपास करत आहे. असे म्हटले आहे.

आपातकालीन पथकातील कर्मचाऱ्यांनी केमिकल सूट परिधान केले असून दूतावासाच्या इमारतीमध्ये त्यांनी प्रवेश केल्याचे सांगण्यात आले आहे. अद्यापपर्यंत कुठलीही अनुचित घटना घडल्याचं वृत्त नसून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे फेडेरल पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी सिडनीतील अर्जेंटिनाच्या वाणिज्य दूतावासात संशयास्पद सफेद पावडर सापडली होती.