वीज पडून ११ जणांचा मृत्यू, १३ जखमी

प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । पाटणा

बिहारमध्ये शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी वीज पडून जवळपास ११ जणांचा मृत्यू झाला तर तेराहून अधिक जण जखमी झाले आहेत. बिहारमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.

बिहारमधील सहारसा जिल्ह्यात सहा जणांचा तर दरभंगा जिल्यात चौघांचा व मेधापूर जिल्ह्यात एकाचा वीज पडल्याने मृत्यू झाला आहे. तर तेराहून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

बिहार सरकारने वीज पडल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे.