तमिळनाडूत गजा चक्रीवादळात 11 जणांचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । चेन्नई

तमिळनाडून गाजा चक्रीवादळाने समुद्री किनारपट्टी भागात हैदोस घातला असून यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 80 हजारहून अधिक लोकांनी मदत छावणीत आसरा घेतला आहे. मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये तर जखमींना १ लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे. तर किरकोळ जखमींना 25 हजार रुपये देण्याचीही घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री पलानीस्वामी म्हणाले की, “गजा वादळाचे सर्वाधिक फटका नागपट्टिनम भागाला पोहोचला आहे. राज्यात ४७१ मदत छावण्या उभारल्या असून त्यात 81 हजार 948 लोकांनी आसरा घेतला आहे. अधिकार्‍यांनी प्रभावित क्षेत्रात सर्वेक्ष सुरू केले असून केंद्र सरकारकडूनही आम्ही मदत मागण्याचा विचार करत आहोत” असे त्यांनी सांगितले.

ज्या जिल्ह्यांना वादळाचा तडाखा बसू शकतो त्या भगात राज्य सरकराने ऍलर्ट जारी केला आहे. तसेच 63 हजार 203 लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवले असून नागपट्टिनम आणि कुड्डालोर सह सहा जिल्ह्यात 331 बचाव छावण्या उभारल्या आहेत.