दीड हजार विद्यार्थ्यांसाठी अकरावीची विशेष प्रवेश फेरी

सामना प्रतिनिधी । मुंबई

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अजूनही प्रवेश मिळाला नसलेल्या दीड हजार विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या विशेष फेरीची घोषणा करण्यात आली आहे. या प्राधान्यफेरीचे वेळापत्रक उद्या सोमवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रवेशाच्या चार नियमित फेऱ्या, एक विशेष फेरी आणि त्यानंतर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अशा सहा फेऱ्या ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण झाल्या आहेत. दुसऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी ८ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये एकूण पाच हजार ६१९ विद्यार्थ्यांचा प्रकेश जाहीर झाल्याची माहिती शिक्षण उपसंचालक विभागाने जाहीर केली. मात्र अजूनही एक हजार ८४२ विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. या विद्यार्थ्यांसाठी ही विशेष फेरी होणार आहे.