पूर्वा एक्स्प्रेस रुळावरून घसरली,13 प्रवासी जखमी

1

सामना ऑनलाईन । कानपूर

हावडा येथून नवी दिल्लीला जाणाऱ्या पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डब्बे कानपुरजवळील रुमा गावाजवळ रुळांवरून घसरले आहेत. या अपघातात 13 प्रवासी जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातामुळे या मार्गावरील 11 गाड्या दिवसभरासाठी रद्द करण्यात आल्या आहेत.

उत्तर प्रदेशातील कानपुरजवळील रुमा येथे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास  पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डब्बे रुळावरून घसरले. दुर्घटनेची माहिती मिळताच कानपूरचे जीआरपी, आरपीएफ आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून इतर प्रवाशांना विशेष ट्रेनने दिल्लीकडे रवाना करण्यात आले आहे. पूर्वा एक्स्प्रेसने 900 जण प्रवास करत होते. कपलिंग तुटल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.