कान्हडखेडा फाट्याजवळ साडेबारा लाख रुपयांचा गुटखा जप्त

211

सामना प्रतिनिधी । पूर्णा

ताडकळस रोडवरील कानडखेडा फाट्याजवळ एका वाहनांचा पाठलाग करुन त्या वाहनात असलेला सुमारे ५ लाख रुपयांचा गुटखा व पालम येथील एका गुटखा विक्रेत्याच्या गोडाऊनवर छापा मारुन तेथे सुमारे ७ लाख ५० हजारांचा गुटखा असा एकूण १२ लाख ५० हजार रुपयांचा काळ्याबाजारात जाणारा गुटखा, एक चारचाकी वाहन व तीन आरोपींना पूर्णा पोलिसांनी ताब्यात घेतले.

सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास एका चारचाकी वाहनात पालम येथून लाखों रुपयांच्या गुटखा पूर्णा शहराकडे येत असल्याची गोपनीय माहिती एका खबNयांकडून फौजदार चंद्रकांत पवार यांना मिळाली. या खबरीवरुन जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या आदेशावरून फौजदार चंद्रकांत पवार जमादार थरार खान सिद्धीकी, पोलीस कॉन्स्टेबल विष्णू भिसे, लतीफ पठाण, समिर पठाण या पथकाने ताडकळस-पूर्णा रोडवरील कानडखेड फाट्याजवळ सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गुटखा भरुन आलेले चारचाकी वाहन (क्र.एम.एच.२२-ए-११६८) यांचे पाठलाग करुन पकडले. या वाहनांची अधीक तपासणी केली असता या पथकाला त्या वाहनात १६ मोठे पोते गोवा आणि राज निवास गुटखा ज्याची बाजारमुल्य ५ लाख रुपये असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वाहन चालक अंकूश नागोराव सूर्यवंशी (रा.देगांव पूर्णा व गुटखा मालक माणिक कदम रा. पूर्णा) यांना ताब्यात घेऊन पूर्णा पोलीस ठाण्यात आणले. या गुटखा तस्करी संदर्भात अधीक कसून चौकशी केली असता, हा गुटखा जिल्ह्यातील पालम येथील मुंजा रोकडे यांच्याकडून आणला असल्याचे झाले. ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांना कळवली. त्यानंतर त्यानंतर तात्काळ फौजदार चंद्रकांत पवार व त्यांच्या पथकाने तवेळ न दवडता पालम येथे जाऊन दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मुंजा रोकडे यांच्या गोडाऊन वर छापा मारला यात असता त्या गोडाऊन मध्ये सुमारे ७ लाख लाख रुपयांचा गोवा व राज निवास गुटख्याचे मोठे ३० पोते मिळून आले.तात्काळ मुंजा रोकडे व ७ लाख रुपयांचा गुटखा ताब्यात घेऊन पुर्णा पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी ३ जणांना पूर्णा पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चंद्रकांत पवार हे अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या