उत्तर प्रदेशात सिलेंडर स्फोटात 12 शालेय विद्यार्थी जखमी

1

सामना ऑनलाईन । बुलंदशहर

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. नारायणपूरमध्ये एक सिलेंडरच्या स्फोटात 12 हून अधिक शालेय विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या इस्पितळात दाखल केले आहे. दुपारी दोन वाजता ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार नारायणपूर गावात दुचाकीवर गॅस वाले फुगे विकणारा व्यक्ती आला होता. त्याच्याकडे अनेक मुले फुगे घ्यायला गेले तेव्हा त्याच्याकडील सिलेंडर फुटला. तिथे उपस्थित अनेक विद्यार्थी जखमी झाले.

पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थाळी धाव घेतली आणि जखमींना उपचारार्थ इस्पितळात दखले केले. अनेक गंभीर विद्यार्थ्यांना अलीगडच्या इस्पितळात हलवण्यात आले आहे.