कमला मिलच्या मोजो टेरसमधील ‘अग्नितांडव’

सामना ऑनलाईन । मुंबई

१. मुंबईत लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमध्ये मोजो टेरेस पब आणि वन अबोव्ह पबला आग, १४ ठार.
२. मृतांमध्ये ११ महिला आणि तीन पुरुषांचा समावेश, सर्व मृत २२ ते ३० वयोगटातील.
३. दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले आदेश.
४. महापालिकेचे ५ अधिकारी निलंबित, सहाय्यक आयुक्तांची बदली; अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल होऊ शकतात, मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत.
५. आगीत होरपळून नाही तर धुराने गुदमरल्यामुळे झाले मृत्यू, डॉक्टरांची माहिती.

फोटो गॅलरी – कमला मिलमधील ‘अग्नितांडव’

६. हलगर्जीपणाप्रकरणी पबमालकांच्याविरोधात गुन्हा दाखल.
७. आग गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास लागली.
८. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या, सहा पाण्याचे टँकर यांनी दोन तासांत आग आटोक्यात आणली.
९. आग लागली तेव्हा एक पबमध्ये वाढदिवसाची पार्टी सुरू होती.
१०. वाढदिवशीच खुशबू मेहता (२८) हिचा दुर्घटनेमध्ये मृत्यू.
११. मुंबईच्या अग्नितांडवाचे संसदेत पडसाद, राष्ट्रपतींनी दु:ख व्यक्त केले.

झोपलेल्या पांडूला ‘त्यांनी’ वाचवलं, अंगावर काटा आणणार अनुभव

महिलेचा जीव वाचवताना दोघांचा मृत्यू