त्र्यंबकेश्वरात ‘नारायण नागबली’ विधीवरून हाणामारी, 17 पुरोहितांविरुद्ध गुन्हा

151

सामना प्रतिनिधी । नाशिक

मूळ त्र्यंबकेश्वरमधील रहिवासी असलेले स्थानिक पुरोहित आणि त्र्यंबकेश्वरच्या बाहेरून आलेले पुरोहित यांच्यात नारायण नागबली विधी करण्यावरून झालेल्या हाणामारी प्रकरणी सतराजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्र्यंबकेश्वरमधील मूळ रहिवासी असलेल्यांनाच नारायण नागबली विधी करण्याचा अधिकार परंपरेनुसार आहे, असा स्थानिक पुरोहित संघाचा दावा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्र्यंबकेश्वरच्या बाहेरून आलेल्या पुरोहितांनीही हा विधी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे स्थानिक विरुद्ध प्रांतस्थ म्हणजेच त्र्यंबकेश्वरच्या बाहेरील पुरोहित असा वाद निर्माण झाला आहे. आनंद आखाडय़ाजवळील भाडय़ाने घेतलेल्या जागेवर शुक्रवारी बाहेरील पुरोहितांनी नारायण नागबली विधी केल्याने स्थानिक पुरोहितांनी आक्षेप घेतला, त्याचे पर्यावसन दोन्ही गटातील हाणामारीत झाले. अनिल कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सतरा पुरोहितांविरुद्ध त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या