सोमालियात राष्ट्रपती भवनाजवळ बॉम्बस्फोट; १८ जणांचा मृत्यू, २० जण जखमी

सामना ऑनलाईन । मोगादिशू (सोमालिया)

सोमालियाची राजधानी मोगादिशू शनिवारी दोन कार बॉम्बस्फोटांनी हादरली. या बॉम्बस्फोटत १८ जणांचा मृत्यू झाला, तर २०हून अधिक यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे सरकारने बॉम्बस्फोटापूर्वी एक दिवस आधीच दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आला होता. अल कायदा या संघटनेशी संबंधित असलेल्या अल-शबाब या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

मोगादिशू येथे असलेल्या राष्ट्रपती भवनाजवळ आणि एका हॉटेलसमोर दोन कारमध्ये हा भीषण स्फोट झाला. हल्ल्यातील अनेक जण गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत दुसऱ्यांदा राजधानी मोगादिशूला टार्गेट करण्यात आलं आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या स्फोटात ५१२ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यामागेही अल-शबाब हीच दहशतवादी संघटना असल्याचं सोमालिया सरकारनं स्पष्ट केलं होते.