नदीत बोट उलटून १९ जणांना जलसमाधी

सामना ऑनलाईन । लखनौ
उत्तरप्रदेशमधील बागपतमध्ये यमुना नदीत बोट उलटून १९ जणांना जलसमाधी मिळाली आहे. ग्रामस्थांच्या मदतीने प्रशासनाने मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. १५ जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांच्यावर जवळील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एनडीआरएफची टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे.
बागपतमधील काठा गावात हा अपघात झाला. क्षमतेपेक्षा जास्त लोक बोटीत बसल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघातानंतर १५ जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. बोटीत बहुतांश मजूर होते, ते मजुरीसाठी बागपतहून हरियाणाला जात होते.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवाईंकांना नातेवाईकांना दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.