बॉक्स ऑफिसवर ‘2.0’चा कल्ला, ‘बाहुबली’ला पछाडत जमवला सर्वाधिक गल्ला

सामना ऑनलाईन । मुंबई

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि खिलाडी अक्षय कुमार यांचा ‘2.0’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मजबूत गल्ला जमवत आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनच्या कमाईचे आकडे समोर आले असून याबाबतीत ‘2.0’ ने ‘बाहुबली- द बिगनिंग’ या चित्रपटाचा विक्रम मोडीत काढला आहे.

ट्रेड अॅनालिस्त तरण आदर्शने याबाबत एक ट्वीट केले आहे. या ट्वीटनुसार, ‘2.0’ या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने पहिल्या सहा दिवसांमध्ये 122.50 कोटींची जबरदस्त कमाई केली आहे. पहिल्या सहा दिवसांच्या कमाईबाबत या चित्रपटाने सुपरहिट ‘बाहुबली- द बिगनिंग’ या चित्रपटाला मात दिली आहे.

‘2.0’ या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनच्या पहिल्या सहा दिवसांची कमाई पुढीलप्रमाणे –

  • पहिला दिवस (गुरुवार) – 20 कोटी 25 लाख
  • दुसरा दिवस (शुक्रवार) – 18 कोटी
  • तिसरा दिवस (शनिवार) – 25 कोटी
  • चौथा दिवस (रविवार) – 34 कोटी
  • पाचवा दिवस (सोमवार) – 13 कोटी 75 लाख
  • सहावा दिवस (मंगळवार) – 11 कोटी 50 लाख

दरम्यान रमेश बाला यांच्या म्हणण्यानुसार या चित्रपटाने देश आणि विदेशात मिळून पहिल्या दिवशी 100 कोटींची कमाई केली. याबाबत अक्षय कुमारने विक्रम केला असून बॉलिवूडमध्ये तो पहिला कलाकार आहे ज्याच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 100 कोटींची कमाई केली.