फक्त ४ मिनिटांत विकले अडीच लाख मोबाईल !

62

सामना ऑनलाईन । मुंबई

‘रेडमी मी ४-ए’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
शाओमी कंपनीच्या रेडमी ४-ए या नव्या स्मार्टफोनने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अवघ्या चार मिनिटांमध्ये या फोनच्या सुमारे अडीच लाख युनिटस्ची विक्री झाली असून काही मिनिटांतच हा फोन ‘आऊट ऑफ स्टॉक’ झाला आहे. ऍमेझॉन आणि एमआयच्या वेबसाइटवर गुरुवारी दुपारी १२ वाजता रेडमी ४-ए हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला होता. ऍमेझॉनवर ग्राहकांसाठी अतिरिक्त १० टक्के डिस्काऊंटदेखील देण्यात आले होते. अवघ्या ५,९९९ या किमतीत ५ इंचाचा एचडी डिस्प्ले, १६ जीबी इंटरनल मेमरी, फ्रंट ७ आणि बॅक १३ मेगापिक्सल कॅमेरा आणि २ जीबी रॅम अशी फिचर्स असल्यामुळे हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या अक्षरशः उडय़ा पडल्या. या स्मार्टफोनचा पुढील ऑनलाइन सेल ३० मार्चला होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या