स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या अनावरणाच्या जाहिरातीवर 2.64 कोटी खर्च

83

सामना ऑनलाईन । गांधीनगर  

सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या उद्घाटनाच्या जाहिरातीवर 2.64 कोटी खर्च झाले. माहिती अधिकारात ही माहिती उघड झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 ऑक्टोबर 2018 रोजी या स्मारकाचे उद्घाटन केले होते. हे स्मारक जगातले सर्वात मोठे स्मारक आहे.

मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते जतीन देसाई यांनी केलेल्या अर्जात ही माहिती मिळाली आहे. टीव्ही मीडियात दिलेल्या जाहिरातीत 2 कोटी 62 लाख, 48 हजार 463 रुपये तर इतर जाहिरातीत एक लाख 68 हजार, 415 रुपये खर्च झाले आहेत.

वडोदरापासून 100  किमीवर नर्मदा नदीच्या एका बेटावर सरदार पटेल यांची 182 मीटर ऊंच भव्य मूर्ती बनवण्यत आली आहे. ही मूर्ती जगातील सर्वात ऊंच मूर्ती असून याच्या निर्मितीसाठी 3 हजार कोटींचा खर्चा आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या