नगर : पथदिवे घोटाळा प्रकरणात निलंबित उपायुक्तांसह दोघांना अटक

सामना ऑनलाईन । नगर

येथील चाळीस लाखांच्या पथदिवे घोटाळा प्रकरणात नगर पोलिसांनी मोठी कारवाई केलीय. या प्रकरणात निलंबित उपायुक्त विक्रम दराडे, मुख्य लेखाधिकारी दिलीप झिरपे यांना पोलिसांनी अटक केलीय. तोफखाना पोलिसांनी गुरुवारी दुपारी त्यांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी ही कारवाई केली.

या प्रकरणी ठेकेदार सचिन लोटके या पोलीस कोठडीत आहे तर लिपीक भरत काळेला न्यायालयीन कोठडी आहे. आरोपी रोहिदास सातपुते याचा पिंपळगाव पिसा (ता. श्रीगोंदा) येथील घरावर सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने  छापा टाकला. सातपुते यांची घर आणि फार्महाऊसची झडती घेण्याचे काम सुरू आहे.