चंद्रपुरात २ जहाल नक्षलवाद्यांना अटक

प्रातिनिधीक फोटो

सामना प्रतिनिधी । चंद्रपूर

चंद्रपूर पोलिसांनी शुक्रवारी २ जहाल नक्षलवाद्यांना अटक केले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही नक्षलवाद्यांवर मोठे बक्षिस जाहीर करण्यात आले होते. रामन्ना आणि पद्मा अशी या अटक केलेल्या नक्षलवाद्यांची नावं आहेत. रामन्ना हा दंडकारण्य स्पेशल झोनल कमेटी मेंबर असून त्याच्यावर २५ लाखांचे बक्षिस आहे, तर पद्मा ही एरिया कमेटी मेंबर असून तिच्यावर ६ लाखांचे बक्षिस आहे.

दोन्ही नक्षलवादी लाहेरी पोलीस स्टेशनच्या ‘वॉन्टेड’ लिस्टमध्ये सामिल आहेत. त्यामुळे अटक केल्यानंतर त्यांना लगेच गडचिरोली पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. या दोघांनाही चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली, असल्याचे सांगण्यात येत आहे. नक्षलग्रस्त भागातील या दोन जहाल नक्षल्यांना पकडल्याने चंद्रपूर पोलिसांच्या हाती मोठे यश लागले आहे.