तोंडात चार्जरची पिन टाकली, दोन वर्षांच्या बालिकेला लागला करंट

2

सामना ऑनलाईन। मीरत

मीरत येथील बुलंदशहरमधील जहांगिराबाद येथे तोंडात चार्जरची पिन टाकल्याने दोन वर्षांच्या बालिकेला करंट  लागल्याची घटना घडली आहे. शिहवर असे या बालिकेचे नाव असून ती आजीला भेटण्यासाठी आईबरोबर आजोळी आली होती.

घरात अनेकजण होते. त्यातील एकाने मोबाईल चार्जिंगला लावला होता. त्यानंतर  प्लगला चार्जर तसाच सुरू ठेऊन ती व्यक्ती मोबाईल घेऊन बाहेर निघून गेली. शिहवर बाजूलाच खेळत होती. तिने चार्जरची पिनचं तोंडात टाकली आणि दुसऱ्याच क्षणाला ती लांब फेकली गेली. त्यानंतर प्रसंगवधान दाखवत घरातल्यांनी तिला तात्काळ डॉक्टरांकडे नेले.