प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाची 20 वर्षे पूर्ण

1

सामना ऑनलाईन, मुंबई

विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाला 27 ऑक्टोबर 2018ला 20 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. शंकरराव अभ्यंकर यांच्या हस्ते जलतरण प्रशिक्षक अरविंद साठये, जिम्नॅस्टीक प्रशिक्षक नीलम बाबर-देसाई, राजीव डिसोझा, पत्रकार नारायण सावंत, कर्मचारी संजय देसाई, जयसुभाष नायर व कविता प्रभुलकर यांना गौरवण्यात आले. 1998 साली सुरु झालेल्या या क्रीडा संकुलात जलतरण, ज्युडो, तायक्वांदो, रायफल शूटींग, रोलर स्केटींग, योगा, जलतरण डायव्हिंग, मार्शल आर्टस् या क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण युवकांना तज्ञांकडून दिले जात आहे.