उत्तर कोरियात अणुचाचणीमुळे बोगदा कोसळला; २०० ठार

सामना ऑनलाईन,टोकियो

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ला करण्याचा अनेक वेळा इशारा देऊनही उत्तर कोरियाचा माथेफिरू हुकूमशहा किम जोंग उन याने अणुचाचणीचा धडाका सुरूच ठेवला आहे. भूमिगत शक्तिशाली अणुचाचणीनंतर भूकंपसदृश हादरे बसले आणि बोगदा कोसळून २००वर कामगार मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे. या अणुचाचणीमुळे उत्तर कोरियाच्या दक्षिण भागातील डोंगर खचले असून मोठय़ा प्रमाणावर भूस्खलन झाले आहे. चीनच्या सीमेवर किरणोत्सर्ग होण्याचा धोका निर्माण झाल्याने जगभरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

जपानच्या ‘असाही’ टी.व्ही.ने दिलेल्या वृत्तानुसार ३ सप्टेंबरला उत्तर कोरियाने पुंग्येरी भागात भूमिगत अणुचाचणी घेतली. त्यावेळी अणुचाचणीच्या ठिकाणालगत बोगदा कोसळून २०० कामगार मृत्युमुखी पडले. उत्तर कोरियाने या दुर्घटनेचे माहिती लपवून ठेवली होती. मात्र अणुचाचणीमुळे अनेक ठिकाणी झालेल्या भूस्खलनाची सॅटेलाईट छायाचित्रे आज उपलब्ध झाली आहेत. आज जपानच्या ३८, नार्थ वेबसाईटने ही छायाचित्रे प्रसिद्ध करून उत्तर कोरियातील सूत्रांचा हवाला दिला आहे. उत्तर कोरियाने घेतलेल्या भूमिगत अणुचाचणीमुळे भूकंपासारखा हादरा बसला. अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र्ााrय सर्वेक्षणानुसार अणुचाचणीनंतर भूकंपाची तीक्रता रिश्टर स्केलवर ६.३ एवढी नोंदविली गेली. दुसऱया भूकंपसदृश धक्क्याची रिश्टर स्केलवर नोंद ४.१ इतकी आहे.

सहावी भूमिगत अणुचाचणी

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने अणुचाचणी क्षेपणास्त्र्ा चाचण्यांचा सपाटाच लावला आहे. तसेच या वर्षी ऑक्टोबरपर्यंत ११ क्षेपणास्त्रांच्याही चाचण्या घेतल्या आहेत. अमेरिकेने वारंवार हल्ल्याचा इशारा दिल्यानंतरही किम जोंग उन माघार घेत नाही. २००६पासून उत्तर कोरियाने घेतलेली ही सहावी आणि सर्वात शक्तिशाली भूमिगत अणुचाचणी आहे.

ट्रम्प यांच्या दक्षिण कोरिया, जपान दौऱयापूर्वी धमाका

उत्तर कोरियाला घेरण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नोव्हेंबर महिन्यात दक्षिण कोरिया, जपान, चीन, व्हेतनाम या देशांच्या दौऱयावर जाणार आहेत. तत्पूर्वीच उत्तर कोरियाने अणुचाचणीमुळे बोगदा कोसळून २०० कामगार मृत्युमुखी पडल्याचे अधिकृत वृत्त जाहीर केले आहे.

‘हिरोशिमा’पेक्षा आठपट शक्तिशाली बॉम्ब

जपानच्या हिरोशिमा शहरावर दुसऱया महायुद्धात १९४५ला अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला होता. या अणुबॉम्बपेक्षा आठपट जास्त शक्तिशाली हायड्रोजन बॉम्बची चाचणी उत्तर कोरियाने घेतल्याचे जपानने म्हटले आहे.