|
स‘चिन’ची भिंत
द्वारकानाथ संझगिरी
सचिन तेंडुलकरच्या द्विशतकाने आणि रैनाच्या पदार्पणातल्या शतकाने नुसता फॉलोऑन नाही वाचवला, श्रीलंकेच्या 642 धावांच्या डोंगरावर झेंडा रोवून वर आघाडी मिळवली. मी कालच म्हटले होते. ‘वामना’चं एक पाऊल पुरणार नाही. वामनाची आणखी दोन पावलं श्रीलंका नामक बळीराजाला पाताळात पाठवायला लागणार. त्यातली दोन पावलं सचिनच्या द्विशतकाने पुरवली आणि एक रैनाच्या शतकाने पुरवलं. ढोणीच्या पाऊण शतकाने बळीराजा पुन्हा डोकं वर काढणार नाही, हे पाहिलं. सचिन आज ‘निश्चियाचा महामेरू’ या पद्धतीने खेळला. आज त्याच्यात राहुल द्रविड तर शिरला नाही ना, असे सारखे वाटत होते. आज सचिन चीनच्या अभेद्य भिंतीसारखा उभा राहिला. त्यामुळेच एक हमखास पराभव टीम इंडिया टाळू शकली.............
गिरणी कामगारांच्या जखमेवर केंद्रानेही मीठ चोळले
पोद्दार, भारत मिल विकायला काढली
नवी दिल्ली, दि.29 (वृत्तसंस्था) - राज्य सरकारपाठोपाठ मुंबईतील गिरणी कामगारांच्या जखमेवर आज केंद्र सरकारनेही मीठ चोळले. रा्रीय वस्त्राद्योग महामंडळाच्या (एनटीसी) ताब्यातील मुंबईतील गिरण्यांची 55 एकर जागा येत्या वर्षभरात विकण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. त्यानुसार मंुंबईतील पोद्दार व भारत टेक्सटाईल्स या दोन मिल्सची ऑनलाईन विक्री सुरू झाली असून, या जमिनीही बिल्डरांच्याच घशात जाणार हे स्प झाले आहे. ‘वस्रां’च्या नावाखाली सुरू असलेल्या जमीन विक्रीच्या या ‘उद्योगा’तून केंद्र सरकार 5 हजार कोटींची घसघशीत कमाई करणार असून, गिरणी कामगार मात्र हक्काच्या घरापासून वंचितच राहणार आहे.............
आजारी महारा्र
मुंबई, दि. 29 (प्रतिनिधी) - मुंबईत मलेरियाने थैमान घातले असतानाच पश्चिम महारा्रासह राज्याच्या उर्वरित भागांत स्वाइन फ्लू आणि साथीच्या अन्य विकारांनी डोके वर काढले आहे. वाढते प्रदूषण, दूषित पाणी आणि ऊन-पावसाच्या खेळामुळे भयानक आजार पसरवणार्या विषाणूंची वेगाने वाढ होत आहे. या विषाणूंच्या निवारणासाठी आवश्यक ते प्रयत्न होत नसल्यामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.............
सरकारी कर्मचारी, गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळालीच पाहिजेत
उद्धव ठाकरे यांनी ठणकावले
सरकारी कर्मचारी आणि गिरणी कामगार यांना जोपर्यंत त्यांच्या हक्काची घरे मिळत नाहीत, तोवर शिवसेना कदापि गप्प बसणार नाही, असा संतप्त इशारा शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला.
बैजू पाटील यांच्या ‘वाइल्ड स्फेप’ छायाचित्र पुस्तकाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते आज झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला ठणकावले.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, वांद्रे येथील सरकारी कर्मचार्यांची वसाहत डिबी रिऍल्टिज कंपनीला कालच विकासासाठी दिली. त्या जागेवर राहणारे सर्व सरकारी कर्मचारी आहेत............
वैतागलेल्या तरुणाचा कॉंग्रेसच्या जनता दरबारात आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई, दि. 29 (प्रतिनिधी) - कंपनीने चालवलेला अन्याय व तक्रारी करूनही शासनाकडून कोणताही दिलासा न मिळाल्याने कैलास खटकाळे या तरुणाने आज कॉंग्रेस कार्यालयात सुरू असलेल्या वस्त्रोद्योग मंत्री नसीम खान व कामगार राज्यमंत्री पद्माकर वळवी यांच्या जनता दरबारातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.............
‘सही रे सही’च्या कुंडळीत सुयोग
1 ऑगस्टपासून ‘पुन्हा’ रंगभूमीवर!
मुंबई, दि. 29 (प्रतिनिधी) - ‘सही रे सही’ या नाटकाच्या हक्कावरून सुरू असलेले अस्थिरतेचे संकट अखेर दूर झाले असून ‘सुयोग’ निर्मित ‘पुन्हा सही रे सही’ या नाट्याला न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे 1 ऑगस्टपासून पुन्हा एकदा नव्या दमात या विक्रमी नाटकांचे प्रयोग सुरू होणार आहेत.............
ज्येष्ठ हिंदुत्ववादी विचारवंत डॉ. स. ह. देशपांडे यांचे निधन
पुणे, दि. 29 (प्रतिनिधी) - ज्येष्ठ हिंदुत्ववादी विचारवंत, साहित्यिक डॉ. स. ह. देशपांडे (वय 86) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ग्रामीण शिक्षणक्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. रा्रवाद हा त्यंाचा विशेष अभ्यासाचा विषय होता. सावरकर ते भाजप हा त्यांचा ग्रंथ विशेष गाजला............
साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अशोक वैती
ठाणे दि. 29 (प्रतिनिधी):- ठाण्यात होणार्या 84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी महापौर अशोक वैती यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष पां. के. दातार यांनी आज हा निर्णय जाहीर केला.
.............
|