दादरच्या नामांतराचा प्रस्तावच नाही
नागपूर, दि. ४ (प्रतिनिधी) - दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा वाद चांगलाच पेटला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र दादरचे ‘चैत्यभूमी’ असे नामांतर करण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रस्तावच नाही, असे सांगत पत्रकारांना जबरदस्त धक्का दिला.
दादरच्या नामांतराचा विषय पक्षात कुठेही चर्चिला गेला नाही. तसेच हा मुद्दा पक्षाच्या अजेंड्यावरही नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. त्यामुळे दादरचे ‘चैत्यभूमी’ असे नामांतर करण्याचा उभा केलेला वाद ही राष्ट्रवादीने सोडलेली निव्वळ पुडी आणि शिवशक्ती-भीमशक्ती यांच्यात टाकलेली काडी होती, असे आता स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीमध्ये स्टेडियमला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या ठरावाची अंमलबजावणी तब्बल २० वर्षे रखडली आहे. त्याबाबत पत्रकारांनी छेडले असता अजित पवार यांनी गोलमाल उत्तरे देत वेळ मारून नेली.
नामांतरामुळेच उपमुख्यमंत्री टार्गेट - आबा
कोल्हापूर : अजित पवार यांनी दादरच्या नामांतराचा प्रस्ताव नसल्याचे स्पष्टीकरण दिले असले तरी राष्ट्रवादीचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मात्र दादरच्या नामांतरावरून शिवसेनेची कोंडी झाली आहे. त्यामुळेच अजित पवार यांना टार्गेट केले जात आहे, असा आरोप कोल्हापूरात केला.

 

Print this page

Send This Page

Pratikriya Kalwa

 


 

आपली प्रतिक्रिया कळवा