|
मतदान करू शकतो, देशासाठी लढू शकतो, दारू पिऊ शकत नाही
याला काय म्हणावे?
मुंबई, दि. ४ (प्रतिनिधी) - दारू पिण्यासाठी २५ वर्षांची मर्यादा घालणार्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावर महानायक अमिताभ बच्चन यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ‘अठरा वर्षांचा तरुण मतदान करू शकतो. लष्करात भरती होऊन देशासाठी लढू शकतो, पण दारू प्यायची की नाही हे ठरवू शकत नाही. सरकारच्या या तर्काला काय म्हणावे, अशी खिल्ली अमिताभ यांनी उडविली आहे. ट्विटरवर त्यांनी याविषयी अत्यंत उपरोधिक शब्दांत प्रतिक्रिया नोंदविली आहे. रोजच्या व्यवहारातील उदाहरणे देऊन त्यांनी सरकारच्या निर्णयातील फोलपणा दाखवून दिला आहे..............
उपोषणाचे प्रिमियर लीग
नवी दिल्ली, दि. ४ (प्रतिनिधी) - काळा पैसा आणि भ्रष्टाचाराच्या अक्राळविक्राळ प्रश्नावर उपोषणाची घोषणा करून कॉंग्रेसच्या केंद्रीय मंत्र्यांना आपल्या नाकदुर्या काढायला लावणारे ‘योगगुरू’ रामदेवबाबा यांना आज केंद्र सरकारने जबरदस्त धोबीपछाड दिला. बाबांचे आजपासून नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर सुरू झालेले उपोषण हे सरकारशी संगनमताने केलेले ‘प्रिमियर लीग’चे ‘फिक्सिंग’ होते, याचा पर्दाफाश आज झाला. सरकारने लेखी आश्वासन देताच उपोषण पहिल्यादिवशीच संपवू, असे लेखी अभिवचन रामदेवबाबा यांनी दिल्याचे उघड झाले आहे. तसेच मंजूर मागण्यांबाबत त्यांनी अध्यादेशाचा आग्रह न धरता सरकारकडून लेखी आश्वासनावर समाधान मानण्याची घेतलेली भूमिकाही ‘फिक्सिंग’ची निर्दशक ठरली आहे...................
अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात २६/११चा मास्टरमाइंड
इलियास कश्मिरी ठार
इस्लामाबाद, दि. ४ (वृत्तसंस्था) - २६/११च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि अल कायदाचा खतरनाक अतिरेकी इलियास कश्मिरी हा अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला. हिंदुस्थानात झालेल्या अनेक धमाक्यात त्याचा हात होता. या हल्ल्यात कश्मिरीसोबत नऊ अतिरेकीही ठार झाले.
गेल्या महिन्यातच अमेरिकेने पाकिस्तानात घुसून अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला गोळ्या घातल्या. त्यानंतर पाकिस्तानने अशी घुसखोरी पुन्हा सहन केली जाणार नाही, अशी दमबाजी अमेरिकेला केली होती................
पाटी, पुस्तक घेऊ चला!
बच्चे कंपनीच्या स्वागतासाठी बाजारपेठा सज्ज
मुंबई, दि. ४ (प्रतिनिधी ) - कोरी करकरीत रंगीबिरंगी वह्या-पुस्तके, या वह्या-पुस्तकांचा हवाहवासा वाटणारा सुगंध, तर्हेतर्हेच्या वॉटरबॅग, दफतरे शाळेतील बच्चे कंपनीला खुणावू लागल्या आहेत. नव्या वर्गांची नवी पुस्तके, नव्या वह्या खरेदी करण्याचा प्रचंड उत्साह मुलांमध्ये दिसत आहे. त्यातच बहुतांश पालकांचे पगारही झाले असल्यामुळे उद्याच्या रविवारची संधी साधून शाळेची खरेदी करण्याचे बेत पक्के झाले आहेत. दुकानदारांनीही छोट्या ग्राहकराजांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे................
दादरच्या नामांतराचा प्रस्तावच नाही
नागपूर, दि. ४ (प्रतिनिधी) - दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा वाद चांगलाच पेटला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र दादरचे ‘चैत्यभूमी’ असे नामांतर करण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रस्तावच नाही, असे सांगत पत्रकारांना जबरदस्त धक्का दिला.
दादरच्या नामांतराचा विषय पक्षात कुठेही चर्चिला गेला नाही. तसेच हा मुद्दा पक्षाच्या अजेंड्यावरही नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. त्यामुळे दादरचे ‘चैत्यभूमी’ असे नामांतर करण्याचा उभा केलेला वाद ही राष्ट्रवादीने सोडलेली निव्वळ पुडी आणि शिवशक्ती-भीमशक्ती यांच्यात टाकलेली काडी होती, असे आता स्पष्ट झाले आहे.................
हिंदुस्थानची विजयी सलामी
पोर्ट ऑफ स्पेन, दि. ४ (वृत्तसंस्था)- शेवटच्या ५ षटकांत ठोकलेल्या ७२ धावांच्या जोरावर हिंदुस्थानने उभारलेल्या ६ बाद १५९ धावांचा पाठलाग करणे वेस्ट इंडीजला जमले नाही आणि पाहुण्यांनी एकमेव ट्वेण्टी-२० लढत १६ धावांनी जिंकली...............
|