मुंबई मेरी जान
नवीन वर्षाचं स्वागत आपण नव्या उमेदीने केलंय. जगण्याचं स्पिरीट आपण २०१२ मध्येही दाखविणार आहोत. म्हणूनच आज अभिनेता अंकुश चौधरी आपल्यासोबत जीवाची मुंबई करतोय. चहाच्या टपरीपासून गर्दीतल्या जल्लोषापर्यंत सर्वत्र २०१२ चा आशावाद झळकतोय. हेच दाखवतोय अंकुश एका ‘झकास’ स्टाईलमध्ये!
मराठी चित्रपट एकाच वेळी १९५ थिएटर मध्ये पहिल्यांदा झळकण्याचा रेकॉर्ड करणारा झकास २०१२ वर्षातला पहिला चित्रपट ठरला. लहानपणापासून प्रत्येकाला अन्न वस्र आणि निवारा या मूलभूत गरजा असल्याचं शिकवलं जातं. पण सध्या शहरातल्या मुलांसाठी मूलभूत गरजा गाडी, घर आणि जॉब अशा झाल्या आहेत. याचा मनोरंजक हास्यात्मक ब्लास्ट झकासमध्ये पाहायला मिळतोय.
शहरी मुलाचा या गरजा पुरविण्यासाठी तीन वेगवेगळ्या मुलींंचा आसरा घ्यावा लागतो. त्यातून झालेली कॉमेडी हे चित्रपटाचे कथानक आहे....................

हे वयच असं असतं?
मुलं आपल्यापासून दुरावतात की काय, असा प्रश्‍न पालकांना मुलं वयात आली की पडतो. हे वयच असं असतं असं स्वत:ला समजावण्याचा प्रयत्न करतात, पण मनात कुठेतरी धाकधूक सुरूच असते...पण सध्याच्या युवा पिढीच्या मनात चाललंय तरी काय? टेक्नोसॅव्ही जगात पालक आणि मुलांचे संबंध टिकून राहणार तरी कसे? अशाच काही प्रश्‍नांची उत्तरं घेऊन आम्ही काही कौन्सिलर्सची भेट घेतली. सध्याच्या युवा पिढीचा पालकांशी दुरावत चाललेला संबंध नेमका कोणत्या कारणांशी संबंधित आहे, यावर त्यांची मतं जाणून घेतली. त्यातून लक्षात आलेल्या काही गोष्टी.....................

पखवाजाचे लेणे

पखवाजवादक पद्मश्री शंकरबापू आपेगावकर यांच्या वादनाचा समृद्ध वारसा सांभाळणारे त्यांचे सुपुत्र उद्धवबापू आपेगावकर यांनी भक्तिरसपूर्ण अशा पखवाजाला जगातील संगीतात मानाचे स्थान मिळवून दिले. बापू आजही ऑक्सफर्ड विद्यापीठ, बर्लिन विद्यापीठ फ्रान्स, हॉलंड, बेल्जियम आदी विद्यापीठांत पखवाजाचे धडे देतात. आपल्या मराठमोळ्या गावकरी जगण्याचा प्रत्यक्ष आचार विचारात डोकावतो....................

 

एक शरारत होने को है...
डेटिंग, फ्लर्टिंग साइट्सवर लॉग इन करण्यात मुलींची संख्या बेसुमार वाढतेय. हे तुमच्या लक्षात आलंय का? खर्‍या - खोट्या नावाने बिनधास्त वावर असणारा महिलावर्ग या ऑनलाईन साइट्सवर मुबलक प्रमाणात आहे. ’त्या’ साइट्सवर चांगल्या घरातल्या स्त्री वर्गाने घेतलेली ही नॉटी एण्ट्री भलतीच गाजतेय.
जयेश, २८, मुंबई, अवेलेबल टु चाट.’
‘मीनल, २३, जयपूर, वेटिंग फॉर युअर फ्रेंडशिप.’

या आणि अशा अनेक जाहिराती नेट सर्फिंग करताना वेबसाइटच्या कॉर्नरला दिसतात. मोबाईलवर सर्व्हिस मेसेजच्या बरोरीने असेही नॉटी मेसेज येत असतात. कामाच्या गडबडीत आपण अशा जाहिराती, मेसेज दुर्लक्षित करतो. पण निवांत वेळ मिळाला की आपणही गंमत म्हणून ‘त्या’ साइट कुतूहलाने बघतो. तिथून सुरू होते शरारत.................................

टेक केअर
जकाल सर्वच कामे घरबसल्या कम्प्युटरवरून करण्याचा ट्रेण्ड वाढलाय. त्यामुळे कम्प्युटर म्हणजे ऑफिस ही संकल्पना केव्हाच मागे पडली. कम्प्युटर आला म्हणजेच त्याची काळजी घेणंही आलंच. ऑफिसमध्ये इंजिनीअर ही जबाबदारी पार पाडतात. पण घरी याची काळजी आपणच घेतली पाहिजे यासाठी कम्प्युटर हाताळताना काय करावे याची माहिती करून घेऊन.
- ऍण्टी वायरस : कोणतेही काम करताना मधेच फ्लॅश होणार्‍या जाहिरातींमुळे कम्प्युटरमध्ये वायरस येण्याची शक्यता असते. यामुळे एखाद्या चांगल्या कंपनीचा ऍण्टी वायरस असणे गरजेचे आहे. यामुळे कितीही क्षमतेच्या वायरसला रोखता येईल. मात्र हा ऍण्टी वायरस नेहमी अपडेट असला पाहिजे. यामुळे वायरस साईट्स आपोआप लॉक होतात.................

असे पाहुणे येती...
दहिसरला टू रूम किचनचा फ्लॅट घेतल्यापासून रोहन आणि स्वातीच्या आयुष्यात वेगळंच स्ट्रगल सुरू झालं. अनेक वर्षांच्या सेव्हिंग्जचं फलित असणारं ते घर त्यांना काट्यासारखं टोचायला लागलं. एका खोलीच्या जागेत राहत होतो ते बरं होतं की काय असाही विचार मनात येऊन गेला. या वाटण्याला कारणं होती गावाकडची नाती...रोहन, स्वाती आणि त्याचे आईवडील सगळ्यांना सुखात राहता यावं यासाठी दहिसरला मोठा फ्लॅट घेतला. ही बातमी गावी पाठवताना सगळ्यांनाच आनंद झाला होता. पण तो फार काळ टिकला नाही. दोन-तीन महिने गेले आणि गावचे पाहुणे घरी येऊन राहायला सुरुवात झाली...तेही मोठ्या मुक्कामासाठी!!! शहरात घराचा आसरा देणारं कुणीतरी आहे असं कळल्याने रोहनचा चुलत भाऊ सर्वात आधी दाखल झाला. त्याला मुंबईत हॉटेलिंगच्या व्यवसायात उतरायचं होतं..................

शाळेतला पिंजराच बरा
सिद्धार्थ जाधव
हसणं..बागडणं..मस्ती करणं...आणि आई-बाबांचा मार खाणं...हे करता करता कधी बालपण सरतं ते कळतच नाही. हळूहळू ही सारी निरागसता मागे राहते, आणि मग वेध लागतात लवकर मोठे होण्याचे. मात्र आज स्वतंत्र जगतानाही मनाच्या कोपर्‍यात हरवलेलं हे बालपण कायम असतं...असेच बालपणातल्या काही गमतीशीर आठवणी अभिनेता सिद्धार्थ जाधव याने शेअर केल्यायत.
लहानपणी मी उनाड आणि प्रचंड मस्तिखोर होतो.मात्र तरीही सर्वाचा आवडता होतो. नायगाव येथील सरस्वती हायस्कूलचा मी विद्यार्थी. शाळेत विविध कार्यकमात सहभागी व्हायला आवडायचं. मात्र शाळेत असताना मी कधी मार नाही खाल्ला किंवा कधी नापास नाही झालो. कविता कधी माझ्या लक्षात रहायच्या नाहीत त्यामुळे सिने गाण्यांच्या चालीने मी कविता पाठ करायचो.मला आजही चांगलं आठवतयं, आम्हाला ’बारा गावचं पाणी’ कविता होती आणि ती कविता मी हम्मा हम्मा या हिंदी गाण्याच्या चालीवर पाठ केली होती.ती कविता तशी पाठ केल्याने आजही लक्षात आहे........................

 

सांताक्रुझची खवय्येगिरी
सांताक्रुझ विमानतळ, विद्यापीठ अशा महत्त्वाच्या ठिकाणांमुळे सांताक्रुझचे नाव मुंबईकरांच्या सतत आठवणीत असते. फॅशनेबल उच्चवर्गीय आणि सुसंस्कृत मध्यमवर्गीय यांच्या हटके आवडी निवडीमुळे इथल्या खाद्यसंस्कृतीही इतरांपेक्षा हटकेच आहे. सांताक्रुझच्या खाद्यप्रेमींमध्ये मोङ्गा चॉईस आढळतो. मिश्र संस्कृती आणि पश्‍चिम उपनगराचा स्टाइल टच इथल्या खवय्येगिरीलाही झालाय. सांताक्रुझ पश्‍चिमेतील टिळक रोडवरील ‘शबरी’ हॉटेल लोकप्रिय आहे. युवावर्गाचे हे आवडते ठिकाण आहे.................

ये रेशमी जुल्फे...
सध्याच्या फास्ट लाइफचा परिणाम केसांवर सर्वात आधी दिसून येतो. मग केस गळणे, अकाली पांढरे होण्यासारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे अगदी १६ वर्षांच्या मुलामुलींनाही हेअर कलरिंगची आवश्यकता वाटते.
हेअर कलर करणे म्हणजे मूळच्या केसांचा रंग बदलणे. यामध्ये पांढर्‍या केसांना झाकण्यासाठीच मुळात हेअर कलरिंंग केले जाते असे नाही. केसांना रंगच करायचंय ना तर बर्‍याचदा टीव्हीतल्या जाहिराती पाहून रंगांची निवड केली जाते. केस कलर करायच्या अनेक पद्धती आहेत. पण योग्य ती पद्धत निवडणेच हितकारक ठरेल..................

निसर्गाचा दिवाळसण
जंगल जवळून बघणं हा एक मनस्वी अनुभव असतो. पण जंगल म्हणजे प्राणी, पक्षी, झाडं, फार तर फुलपाखरं, साप, सरडे, किडे हे समीकरण खूपच उथळ आहे. निसर्गाकडे केवढं अंतमुर्ख होऊन बघण्यासारखं, शिकण्यासारखं, विचार करायला लावणार आहे!
पावसाळा व पावसाळ्यानंतरचे डिसेंबर, जानेवारीपर्यंतचे महिने म्हणजे ‘निसर्गाचा दिवाळसणच’ असतो. या महिन्यामध्ये निसर्ग खर्‍या अर्थाने फुलतो, बहरतो, अनेक ‘ऋतुबदल’ घडून येतात.
कुठेही नजरेला खटकेल असा भगभगीत रंगच नसतो. सारी हिरवीगार झाडं जमिनीवर छत्री धरतात, छोट्या वनस्पती भाऊगर्दी करतात. घाणेरी तरारून फुलते. त्यामुळे जागोजाग पिवळ्या-लाल फुलांचं आमिष किड्यांसाठी तयार होतं. फुलपाखरांचा त्यावर विशेष वावर. दुसरं फुलपाखरू येण्यापूर्वी फुलातला मधुरस मटकावण्याची लगबग!.........................

 

नयनरम्य देवका
टूर निघाली... टूर निघाली... क्षणात इकडे क्षणात तिकडे असा मूड प्रत्येक विकेण्डला असतो. दगदगीच्या धावपळीच्या या जीवनशैलीत प्रत्येक जण विकेण्डला निसर्गरम्य वातावरणात रिलॅक्सेशन आणि बरोबरच पिकनीक मूडचे प्लान आखतात. अशा मूडला साजेसा स्पॉट असेल तर बात काही औरच. यासाठीच ‘फुलोरा टीम’ आजपासून प्रत्येक शनिवारी एक नवा रिफ्रेशेबल पिकनिक स्पॉट घेऊन येणार आहे. सो लेट्स एन्जॉय युअर पिकनिक.....
नाणी दमणपासून सुमारे तीन किलोमीटर पुढे गेल्यावर एक नयनरम्य समुद्रकिनारा आपल्याला खुणावतो. या समुद्र किनार्‍याला देवका बीच म्हणतात. सध्याचा सिझन हा बीचेस् एन्जॉय करण्यासाठी एकदमच छान आहे. त्यामुळे येत्या विकेण्डसाठी बीच पर्यटन करायला काहीच हरकत नाही.
गेल्या काही वर्षांत देवका बीचला पर्यटकांचा ओघ मोठ्या संख्येने वाढला आहे. देवका बीचवर विकेण्डसाठी येणार्‍यांना रिलॅक्सेशन बरोबरचं पर्यटनाचा आनंद वाढविण्यासाठी अनेक टुरिस्ट पॉइण्ट आहेेत. वन डे पिकनिक स्पॉट आणि स्वच्छ समुद्रकिनारा यामुळे मनसोक्त भिजण्याचा आनंद घेणारे पर्यटक इथं आढळतात..................

घरचा वशिला
फिल्मी फंडा

बहीण किंवा भावाने आधीच फिल्म इंडस्ट्रीत जम बसवलेला असेल तर त्यांच्या आधाराने धाकट्या भावंडांना करीअर बनवणं सोपं जातं. कपूर घराणं याचं उत्तम उदाहरण आहे. हा सिलसिला अगदी आतापर्यंत सुरू आहे...
बॉलीवूडमध्ये हक्काने प्रवेश मिळवायचा असेल तर तुम्हाला एखादा गॉडफादर लागतोच. पण हा नियम अर्थातच ज्यांचे बहीण-भाऊ आधीच बॉलीवूडचे स्टार्स आहेत त्यांना लागू पडत नाही. त्यांच्यासाठी मोठे बहीण-भाऊ हेच गॉडफादर असतात. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून फक्त चालत राहायचं. त्यामुळे त्यांना स्ट्रगल कमी करावं लागतंच शिवाय पदार्पणासाठी एखादं बडं प्रोडक्शन हाऊस चांगली फिल्म ऑफर करतं. करिश्मा कपूरनंतर करिना कपूरने इंडस्ट्रीत बसवलेलं बस्तान हे त्याचं चांगलंच उदाहरण आहे...............


छोटा पॅकेट बडा धमाका
बॅगांचं मिनिएचर म्हणजे पाऊच, वॉलेट्स, बटवे वगैरे गोष्टी लाईफस्टाइलच्या नियमाप्रमाणे यात सतत नवे नवे बदल होत असतात. आज अशाच नव्या ट्रेण्डी छोट्या पॅकेट्सचं मार्केट फिरूया.
बटवा - मुलींच्या कोणत्याही कपड्यांवर तर बर्‍यापैकी सूट होतो. विशेषतः सलवार कमीज, साडी आणि काही ट्रेडिशन वेअरवरसुद्धा बटवा वापरता येतो. बटवे वेगवेगळ्या आकारात, रंगात मिळतात. त्रिकोणी, गोलाकार वर्क केलेले बटवे आकर्षक दिसतात. लोकरीच्या विणलेल्या प्रकारातही बटवे आहेत. यांच्या किमतीही जास्त नाहीत. १५० रुपयांपासून उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या व्हरायटी मस्जिद ,वांद्रे ,कुलाबा कॉजवे, दादर , यांसारख्या ठिकाणी बघायला मिळतील. फेरीवाल्यांकडे हे बटवे जरूर बघा नक्कीच दुकानांपेक्षा जास्त व्हरायटी बघायला मिळेल........................



 

 

 

 

 

Print this page

Send This Page

Pratikriya Kalwa

 


 

आपली प्रतिक्रिया कळवा