|
अंतिम भाग
मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे महापालिकांवर भगवा
फडकणारच! शिवसेनाप्रमुखांचा आत्मविश्वास
मराठी माणूस जागा आहे, जिवंत आहे!
शिवशक्ती-भीमशक्ती
महाराष्ट्रात क्रांती घडवेल. मराठी माणूस शहाणा आहे. उगाच कुणाच्या मागे
जाणार नाही. तो अत्यंत सावधपणे मतदान करील!
सगळी वृत्तपत्रं बघा ठरवून
विरोधात चालतील. काही काही तर स्वत:ला बादशहा वगैरे समजणारी वृत्तपत्रंही
खेकड्याच्याच चालीत चाललीत. एकीकडे म्हणताहेत एकत्र या. दुसरीकडे फाडा!
स्वत:च फाडताहेत. इतक्या दुष्टपणाने प्रचार करताहेत.
उद्धव जी मेहनत घेतोय आज
त्यास तोड नाही आणि जे काही त्याने दाखवलं की, आम्ही हे करून दाखवलंय वगैरे
वगैरे त्यावरही टीका सुरू आहे. जे काम प्रशासनाचे होते ते श्रेय शिवसेना
घेतेय वगैरे वगैरे. चालू झालंय आता हे राजकारण. त्या गधड्यांना हे कळत नाही
की, रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचं काम कुणाचं? प्रशासनाचं ना? पण आमची सत्ता
आहे म्हणून ती जबाबदारी तुम्ही आमच्यावर टाकलीत. एमएमआरडीएचे खड्डेसुद्धा
तुम्ही आमच्या नावावर खपवता !
रामदास आठवले या माणसामध्ये जे एक कर्तृत्व आहे, त्याचा
नीट वापर झाला पाहिजे. आतापर्यंत रामदासला त्याचा वापर नीट करता आला नाही, पण
आता मात्र तो व्यवस्थित मार्गावर आलाय. तो आज एकमेव असा नेता आहे की,
त्याच्याकडे दलित समाज फार मोठ्या प्रमाणात आहे हे मान्य करावंच लागेल. बाकीचे
निवडणुकीपुरतेच मर्यादित आहेेत आणि नेते असंख्य झाले असे म्हणण्याची पाळी
आंबेडकरांवर येऊ नये असंच मी म्हणेन.
संजय राऊत
मुंबई, दि. १० - जोपर्यंत मराठी माणूस जिवंत आहे तोपर्यंत मराठी
माणसाचा आवाज कोणी दाबू शकणार नाही. मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकणारच
फडकणार! ठाणे, नाशिक, पुणे, उल्हासनगर आणि पिंपरी-चिंचवडवरही भगव्याचीच सत्ता
येईल, असा आत्मविश्वास शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी आज व्यक्त
केला.
मुलाखतीच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात शिवसेनाप्रमुखांनी अत्यंत ठामपणे
सांगितले, ‘शिवसेना-भाजप व भीमशक्ती’ क्रांती घडवेल.
शिवसेनाप्रमुखांनी ‘पेड-न्यूज’च्या विकृतीवर हल्लाबोल केला. इंदू मिलच्या
जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक व्हायलाच पाहिजे, पण कॉंग्रेसवाले
‘स्मारका’च्या निमित्ताने मतांचे राजकारण करीत आहेत. ते उधळून लावा, असे
आवाहनही शिवसेनाप्रमुखांनी केले.
मुलाखतीच्या शेवटच्या भागाची सुरुवात भारतीय जनता पक्षाशी असलेले संबंध व
भीमशक्तीवरून झाली.............................
विरोधकांच्या सातशे पिढ्या उतरल्या तरी मुंबई
महापालिकेवरचा भगवा उतरु देणार नाही
उद्धव ठाकरे यांनी फुंकली विजयाची तुतारी
२५ हजार गटप्रमुखांचा विराट मेळावा
 
गोरेगाव येथील
नेस्को संकुल येथे मंगळवारी झालेल्या शिवसेना गटप्रमुखांच्या विराट मेळाव्याला
मार्गदर्शन करताना शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेवर
केवळ भगवा आणि भगवाच फडकेल अशी गर्जना केली.
मुंबई, दि. १० (प्रतिनिधी) - ‘मुंबई महापालिका निवडणूक म्हणजे लोकशाहीतील एक
युद्धच आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह सारे विरोधक भगवा उतरवण्यासाठी टपून बसले
आहेत. पण शिवसेनेकडे जीवाला जीव देणारा आणि अफझलखानाचं थडगं बांधणार्या
शिवरायांच्या मावळ्यासारखा शिवसैनिक आहे. त्यांची साथ असेपर्यंत विरोधकांच्या
सातशे पिढ्या उतरल्या तरी मुंबईवरचा भगवा उतरू देणार नाही,’ अशी जबरदस्त
गर्जना करीत शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विजयाची तुतारी फुंकली.
गोरेगाव येथील नेस्को संकुल येथे झालेल्या शिवसेनेच्या २५ हजार गटप्रमुखांच्या
विराट मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. शिवसैनिकांची निष्ठा,
मेहनतीचे कौतुक करताना आणि मुंबईत शिवसेनेने केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा
मांडत उद्धव ठाकरे यांनी आपल्या तडाखेबंद भाषणात विरोधकांना अक्षरश: झोडपून
काढले. ......................................
कॉंग्रेस- १६९
राष्ट्रवादी - ५८
नाटक संपले वाटप झाले
मुंबई, दि. १० (प्रतिनिधी) - ‘तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना’ म्हणत
सुरू असलेले कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील बैठकांचे आणि एकमेकांना
‘स्वबळा’च्या धमक्या देण्याचे नाटक अखेर संपले असून आज उशिरा रात्री जागांचे
वाटप पूर्ण झाले आणि आघाडीचे घोडे गंगेत न्हाले. मुंबईत ६५ जागांचा हट्ट
सोडून राष्ट्रवादीने ५८ जागांवर मान डोलावली. कॉंग्रेस १६९ जागा लढणार आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या
बैठकीत रात्री उशिरा आघाडीचा निर्णय झाला. प्रदेश कॉंगे्रसचे अध्यक्ष
माणिकराव ठाकरे, विभागीय कॉंगे्रसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह, राष्ट्रवादी
प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, बांधकाममंत्री छगन भुजबळ, मुंबईचे पालकमंत्री जयंत
पाटील, मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष नरेंद्र वर्मा बैठकीला उपस्थित होते.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, लोकसभा व विधानसभा
निवडणुकांप्रमाणे मुंबई महापालिकेची निवडणूकही दोन कॉंग्रेसनी एकत्र येऊन
लढावी असा आमचा प्रयत्न होता. यापूर्वीच्या दोन निवडणुकांमध्ये त्यात यश आले
नव्हते. मात्र यावेळी आघाडी झाली. ....................................
|