|
‘भारतमाता’त थरार

भारतमाता सिनेमागृहात दहशतवादी घुसले आहेत. असा
वायरलेस संदेश फिरला आणि हा हा म्हणता हे सिनेमागृह पोलिसांची छावणी बनले.
स्थानिक पोलीस, रॅपिड ऍक्शन फोर्स, कमांडो यांनी काही वेळातच सिनेमागृहाचा
ताबा घेतला. काही झाले काहीच समजत नव्हते. बाहेर बघ्यांनी गर्दी केली होती.
त्यातच आतून दोघांना जिवंत पकडून आणण्यात आले. हा खेळ सुमारे तासभर सुरू होते.
खरेच दहशतवादी घुसले नसून हे मॉकड्रील असल्याचे पोलिसांनी सांगितले त्यावेळी
सर्वांचा जीव भांड्यात पडला.
महापालिकेच्या ५० हजार
कर्मचार्यांना थकबाकी मिळणार
म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या प्रयत्नांना यश
मुंबई, दि. १९ (प्रतिनिधी) - म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या प्रयत्नांना
अखेर यश आले आहे. पालिकेतील ५० हजार कर्मचार्यांना लवकरच थकबाकी मिळणार आहे.
तसे आश्वासनच पालिकेच्या प्रमुख लेखापालांनी पालिका सभागृह नेते शैलेश फणसे
यांना दिले आहे. ................................
सरकारकडून पोलीस संरक्षण
मिळत नसल्यानेच झोपडपट्ट्यांत वाढ
मुंबई,
दि. १९ (प्रतिनिधी) - अनधिकृत झोपड्या या केवळ पालिकेच्या जागेवरच नाहीत तर
सरकारी जागांवरही असून या झोपड्यांवर कारवाई करण्यास सरकार पुरेसे पोलीस बळ
पुरवीत नसल्यानेच झोपड्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे महापौर सुनील प्रभू
यांनी सांगितले. महापलिकेला स्वतंत्र पोलीस बळ पुरवण्याची मागणी करण्यात
आल्यानंतरही सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे महापौर म्हणाले. मुंबईत
फक्त महापालिकेची जागा नसून राज्य सरकारचीही जागा आहे. मानखुर्द येथे
जिल्हाधिकार्यांच्या अखत्यारीत जागा असून तेथेही अनधिकृत झोपड्यांचे वर्चस्व
आहे. अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करणे पालिकेची जबाबदारी आहे; परंतु अनेक वेळा
कारवाईदरम्यान झोपडपट्टीधारक आणि पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या
अधिकार्यांमध्ये शाब्दिक भांडण होते. काही वेळा मारहाणीपर्यंत प्रकरण जाते.
त्यामुळे कारवाईदरम्यान पोलीस बळ असणे गरजेचे असते. परंतु राज्य सरकारकडून
वेळेवर पोलीस बळ उपलब्ध होत नसल्याने कारवाईत अडचण निर्माण होते.
...................................
निवृत्तीनंतरही
सुबोधकुमारांना लाल दिव्याची गाडी देणारा अभियंता निलंबित
मुंबई, दि. १९ (प्रतिनिधी) - पालिकेचे माजी आयुक्त सुबोधकुमार यांच्यामुळे
पालिकेच्या सहाय्यक अभियंत्याला नोकरी गमवावी लागली आहे. सुबोधकुमारांना
सेवानिवृत्तीनंतरही वाहन सेवा पुरविल्याचा ठपका ठेवून या सहाय्यक अभियंत्याला
पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी निलंबित केले आहे, तर नियमबाह्यरीत्या
पालिकेची गाडी वापरल्याबद्दल सुबोधकुमारांकडून ३ लाख ७५ हजार रुपये दंड वसूल
करण्याचे आश्वासनही कुंटे यांनी कामगार संघटनांना आज दिले................................
कायद्याचा
काथ्याकूट करीत अखेर उद्या, शुक्रवारपासून सरकारने राज्यात गुटखाबंदी करण्याची
घोषणा केली.
गुटख्याबाबतच्या बातम्यांची चर्चा ऐकलेल्या दादरच्या
बालमोहन शाळेतील दहावीचा विद्यार्थी
ओमकार हिंदळेकर याने लगोलग खास ‘सामना’साठी एक चित्र
रेखाटले. गुटख्याचा कॅन्सर व्यसनाचे
जाळे विणून त्यात युवा पिढीला अडकवतो आणि मृत्यूचा फास
कसा आवळतो
असे हे बोलके चित्र आहे. शाळेतून येता जाता जेव्हा
माझ्या वयाच्या मुलांना गुटखा
खाताना पाहिले तेव्हा न राहवून त्यांना सावध करण्यासाठी
हे चित्र रेखाटल्याचे ओमकारने सांगितले.
परळमध्ये अजगर पकडला
७ फूट लांब, ७ किलो वजन

भरपावसात सर्पमित्रांनी पकडलेल्या अजगराला दाखविताना
सर्पमित्र भरत जोशी, नितीन वाल्मीकी, स्थानिक शिवसेना नगरसेवक नाना आंबोले.
मुंबई, दि. १९ (प्रतिनिधी) — परळ येथे बुधवारी रात्री सर्पमित्र भरत जोशी व
नितीन वाल्मीकी यांनी ७ फूट लांबीचा अजगर पकडला. या अजगराचे वजन ७ किलो होते.
या अजगराला ठाण्याच्या वनविभागाकडे सोपविण्यात आले. परळ येथील गोखले सोसायटी
लेनमधील कांती भुवन येथे बुधवारी रात्री १०.३० वाजता पाऊस सुरू असताना भलामोठा
अजगर रहिवाशांना दिसला. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे नगरसेवक नाना
आंबोले घटनास्थळी धावले. त्यांनी तातडीने सर्पमित्रांना पाचारण केले.
सर्पमित्रांनी भरपावसात तब्बल २ तास मेहनत घेऊन या अजगरास पकडले. इंडियन रॉक
पायथॉन जातीचा हा अजगर आहे. भोईवाडा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली
आहे.
टाइम अप हो गया... पॅकअप!
टाइम अप हो गया... पॅकअप!
सुपरस्टार राजेश खन्ना यांचे हे अखेरचे उद्गार
दुसर्या
कोणी नाही, दस्तुरखुद्द ‘बाबू मोशाय’ अमिताभ बच्चन यांनीच ‘ट्विटर’वर हे
उद्गार टाकलेत. ‘आनंद’च्या जाण्याने ‘बाबू मोशाय’ अस्वस्थ झाले आहेत...
राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्यातलं नातं हा कायमच कुतूहलाचा विषय बनला.
या दोघांतली स्पर्धा आणि इगो याच्या बर्याच दंतकथा प्रसवल्या गेल्या. मात्र
काल काका गेल्यानंतर तातडीने अमिताभ ‘आशीर्वाद’वर पोहोचले. तेथे बिग बी अश्रू
आवरू शकले नाहीत. घरी परतल्यानंतरही ते अस्वस्थ होते. त्यांनी ट्विटरवरून
आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. या ट्विटमध्ये अमिताभ म्हणतात, मी
‘आशीर्वाद’मध्ये पोहोचलो. त्यांच्या निष्प्राण शरीराजवळ उभा होतो. काहीच सुचत
नव्हतं. डोकं सुन्न झालं होतं. ते आता आपल्यात नाहीत यावर विश्वासच बसत
नव्हता. इतक्यात त्यांच्याजवळचं कुणीतरी माझ्याकडे आले. दाटलेल्या कंठानेच तो
माणूस मला म्हणाला, ‘टाइम अप हो गया, पॅकअप’ हे शेवटचे उद्गार होते. पॅकअप
म्हणूनच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मी हे ऐकून स्तब्धच झालो. आयुष्यभर
सिनेमाचा विचार करणार्या राजेश यांच्या मनात शेवटच्या क्षणीही होता तो
सिनेमाच........................................
शत्रुघ्न सिन्हा यांना अतिदक्षता विभागातून हलवले
ज्येष्ठ
अभिनेते व भाजपा नेते शत्रुघ्न सिन्हा यांना आज अतिदक्षता विभागातून बाहेर
काढून सर्वसाधारण वॉर्डात हलवण्यात आले. अजून काही दिवस त्यांना रुग्णालयात
राहावे लागेल, असे सिन्हा यांचे नातेवाईक व निर्माते पहलाज निहलानी यांनी
सांगितले. ६६ वर्षीय शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर गेल्या सोमवारी अंधेरीतील
कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची
प्रकृती सुधारत असून आज सकाळी त्यांना अतिदक्षता विभागातून सर्वसाधारण खोलीत
हलवण्यात आले आहे.
रुपयाच्या चिन्हासह येणार १० आणि ५० रुपयांच्या नोटा
हिंदुस्थानी व्यवहारात वापरल्या जाणार्या चलनी नोटांना आता नवीन ओळख मिळणार
आहे. भारतीय रिझर्व्ह बेँक लवकरच रुपयांच्या नव्या चिन्हांसह १० आणि ५०
रुपयांच्या नोटा बाजारात आणणार आहे. ’महात्मा गांधी सीरीज २००५’ च्या १० आणि
५० रुपयांच्या नोटांवर आरबीआयचे गव्हर्नर डी.सुब्बाराव यांच्या
हस्ताक्षराशिवाय इंग्रजी ’एल’ अक्षरासह रुपयाचे चिन्ह असणार आहे. तर त्याच्या
मागच्या भागावर नोटांची छपाई केलेले वर्ष नमूद केले असेल. तसेच या नोटा सध्या
चलनात असलेल्या नोटांप्रमाणेच असतील, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे.
मुंबईत १२७ बेकर्या अनधिकृत
बेकर्यांमध्ये सिलिंडर स्फोट होऊन आगी लागण्याच्या दुर्घटना अनेकदा घडत
असतात. याप्रकरणी महापालिकेने कडक भूमिका घेऊन अग्निप्रतिबंधक उपाययोजना
नसलेल्या तसेच पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसविणार्या २५६ बेकरीधारकांविरुद्ध
न्यायालयात खटला दाखल केला आहे. यापैकी १२७ बेकर्या या अनधिकृत आहेत.
महापालिकेने ३२८ अधिकृत तर सर्व अनधिकृत बेकर्यांना नोटीस पाठविली होती.
मात्र तरीही २५६ बेकरीधारकांनी आपल्या बेकर्यांमध्ये आवश्यक ती सुधारणा न
केल्याने त्यांना न्यायालयात खेचण्यात आले. या बेकर्यांचे परवानेही रद्द
करून फौजदारी कारवाई होऊ शकते, असे आरोग्य समिती अध्यक्षा गीता गवळी यांनी
सांगितले.
रेशनकार्डसाठी
जनसामान्यांची कुचंबणा करू नका!
सहा आठवड्यांत
अर्ज निकाली काढा, उच्च न्यायालयाचे आदेश
मुंबई, दि. १९ (प्रतिनिधी) - सेतू सुविधा केंद्रामार्फत वितरित होणार्या
रेशनकार्डसाठी सर्वसामान्य गरीब नागरिकांना वारंवार खेटे मारायला लावू नका,
दारिद्य्ररेषेखालील नागरिकांची रेशनकार्डअभावी कुचंबणा होऊ देऊ नका. त्यांचे
अर्ज सहा आठवड्यांत निकाली काढण्याच्या प्रक्रियेला चालना द्या, असा सज्जड दम
उच्च न्यायालयाने संबंधित यंत्रणेला आज दिला....................................................
विदेशी पर्यटकांची
महाराष्ट्राला सर्वाधिक पसंती
मुंबई, अजंठा, वेरुळ, कोंकण लोकप्रिय
मुंबई, दि. १९ (प्रतिनिधी) - हिंदुस्थानात येणार्या विदेशी पर्यटकांपैकी
सर्वाधिक पर्यटकांनी महाराष्ट्राला भेट देण्यास २०११ मध्ये प्राधान्य दिले.
हिंदुस्थानात आलेल्या ४८ लाख पर्यटकांनी महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांना भेट
दिली. तर परदेशातील सर्वाधिक पर्यटकांनी मुंबई शहरातून आपल्या टूरची सुरवात
केली........................................
रेशनकार्डाचेअर्ज सहा आठवड्यांत निकाली काढा
उच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई, दि. १९ (प्रतिनिधी) - सेतू सुविधा केंद्रामार्फत वितरीत होणार्या
रेशनकार्डसाठी सर्वसामान्य गरीब नागरीकांना वारंवार खेटे मारायला लावू नका.
दारिद्र रेषेखालील नागरीकांची रेशनकार्ड अभावी कुचंबणा होऊ देवू नका. त्यांचे
अर्ज सहा आठवड्यात निकाली काढण्याच्या प्रक्रियेला चालना द्या, असा सज्जड दम
उच्च न्यायालयाने संबंधीत यंत्रणेला आज दिला. मालेगांव सेतू सुविधा
केंद्राच्या माध्यमातून वितरीत होणार्या रेशनकार्डला संबंधी होणारा विलंब आणि
सर्वसामान्य व्यक्तींची होत असलेल्या पिळवणुकी विरोधात हमदर्द ग्राहक पंचायत
समितीच्यावतीने मोहमद फारूक एहसान यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली
होती.
दहशतवादाविरुद्धच्या
लढाईतही सरकारी बाबूंची कमाई!
मुंबई,
दि. १९ (प्रतिनिधी) - २६ नोव्हेंबरच्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यानंतर
प्रशासनाने त्यातून कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. या हल्ल्यात शेकडो जणांचा
बळी जाऊनही दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनसामुग्रीच्या
खरेदीत दिरंगाई, भ्रष्टाचार, चालढकल करण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत.२६
नोव्हेंबरच्या अतिरेकी हल्ल्यानंतर शस्त्रस्त्र दलांची प्रतिकार करण्याची
क्षमता वाढावी यासाठी विविध खरेदी करार करण्यात आले आहेत. बॉम्ब नाशक सुटस् ,
टोटल कन्टेन्मेंट व्हेसल, स्पीड बोटस् बुलेटप्रुफ जॅकेटस् आदीसाठी टेंडर
काढून कित्येक महिने लोटले आहेत. सद्यस्थितीत यातील किमान तीन खरेदी करार
भ्रष्टाचाराच्या जंजाळात अडकले आहेत. २६ नोव्हेंबरनंतर ८२ बॉम्ब डिस्पोजल
सुटस् खरेदीसाठी गृह विभागाने टेंडर काढून उद्योजक बिमल अगरवाल यांच्या टेक्नो
ट्रेड इम्पेक्स इंडिया या फर्मला हे कंत्राट देण्यात आले. मार्च २००९ मध्ये
या कराराची संपूर्ण ६.२५ कोटींची रक्कम अदा करण्यात आली असली तरी अद्याप
मालाची डिलिव्हरी झालेली नाही. मार्च २०११ पर्यंत बॉम्ब सुटस् न मिळाल्याने
याप्रकरणी अधिकृतरीत्या तक्रार दाखल झाली. त्यानंतर गुन्हा दाखल होऊन या
फर्मला सध्या गृहविभागाने काळ्या यादीत टाकले आहे..............................................
मुंबई, अजिंठा, वेरुळ,
कोकण लोकप्रिय
विदेशी पर्यटकांची महाराष्ट्राला सर्वाधिक पसंती
मुंबई,
दि. १९ (प्रतिनिधी) - हिंदुस्थानात येणार्या विदेशी पर्यटकांपैकी सर्वाधिक
पर्यटकांनी महाराष्ट्राला भेट देण्यास २०११ मध्ये प्राधान्य दिले.
हिंदुस्थानात आलेल्या ४८ लाख पर्यटकांनी महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांना भेट
दिली. तर परदेशातील सर्वाधिक पर्यटकांनी मुंबई शहरातून आपल्या टूरची सुरवात
केली. केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने नुकत्याच प्रसिध्द केलेल्या
अहवालानुसार महाराष्ट्रानंतर तामीळनाडू राज्याला ३४ लाख लोकांनी तर नवी
दिल्लीला २२ लाख लोकांनी भेट दिली. मुंबईत आलेल्या पर्यटकांनी महाराष्ट्रातील
एलेफंटा, आजंठा व वेरुळ येथील लेणी आवर्जून पाहिली. जपान व चीनच्या पर्यटकांत
ही लेणी अधिक लोकप्रिय आहेत....................................
कांजूरमार्ग क्षेपणभूमी परिसरात कचर्याची
दुर्गंधी

कांजूर क्षेपणभूमीच्या समस्येबाबत महापौर सुनील प्रभू
यांना निवेदन देताना बाबा कदम.
मुंबई, दि. १९ (प्रतिनिधी) - कांजुरमार्ग येथील क्षेपणभूमीत मोठ्या प्रमाणावर
टाकण्यात येत असलेल्या कचर्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे
कन्नमवारनगर, टागोरनगर, कांजूर व्हिलेज आणि भांडुप व्हिलेजमध्ये साथीचे आजार
पसरत आहेत. त्यामुळे महापौरांनी स्वत: या क्षेपणभूमीची पाहणी करावी अशी मागणी
म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी केली....................................................
लैला खानचा हत्यारा परवेझ
टाकच्या पोलीस कोठडीत वाढ
 मुंबई,
दि. १९ (प्रतिनिधी) - बॉलीवूड अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबातील पाच
जणांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला लैला खानचा सावत्र पिता परवेझ टाक
याच्या पोलीस कोठडीत २३ जुलैपर्यंत वाढ करण्याचे आदेश मुंबईतील महानगर
दंडाधिकारी न्यायालयाने आज दिले.लैला खानच्या कुटुंबीयांच्या हत्येप्रकरणी
परवेझ टाक याला गेल्याच महिन्यात अटक करण्यात आली आहे. मात्र या हत्येत त्याला
मदत करणारा त्याचा साथीदार शकीर हुसेन वाणी हा अद्याप फरारी आहे. त्याच्या
ठावठिकाणाबाबत परवेझच माहिती देऊ शकतो. ही माहिती गोळा करण्यासाठी परवेझची
आणखी काही दिवस चौकशी करण्याची गरज असल्याने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करावी,
अशी विनंती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी न्यायालयाला केली. ती विनंती मान्य
करून न्यायालयाने परवेझ टाक याला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत धाडले................................................
म्हाडा संक्रमण शिबिरात
यापुढे शून्य घुसखोरी!
- मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचा निर्धार
- घुसखोरी रोखण्यासाठी करणार खास उपाययोजना
मुंबई,
दि. १९ (प्रतिनिधी) - म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील वाढती घुसखोरी ही एक सध्या
गंभीर आणि नाजूक बाब बनली असून याला राजकीय स्वरूपही प्राप्त झाले आहे.
त्यामुळे घुसखोरी ही म्हाडासाठी डोकेदुखी बनली आहे. या धर्तीवर संक्रमण
शिबिरातील घुसखोरी रोखण्यासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना
मंडळाने खास उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपाययोजनांच्या धर्तीवर
यापुढे शून्य घुसखोरी दिसून येईल, असा दावा दुरुस्ती मंडळाचे सभापती प्रसाद
लाड यांनी आज केला आहे. ........................
पुणे विद्यापीठाच्या निवृत्त प्राध्यापकांना
पेन्शन द्या
उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश
मुंबई,
दि. १९ (प्रतिनिधी) - पुणे विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक डॉ. दिलीप
सदाशिव जोग यांचे पेन्शन थकीत रकमेसह तत्काळ सुरू करण्याचे आदेश मुंबई उच्च
न्यायालयाने आज राज्य सरकारला दिले.डॉ. जोग यांची १४ ऑगस्ट १९८० रोजी लेक्चरर
म्हणून हंगामी तत्त्वावर नेमणूक करण्यात आली होती. साधारण पाच वर्षे सेवा
केल्यानंतर १६ मार्च १९८५ रोजी त्यांना सेवेत कायम करण्यात आले, तर १९ मे
१९८९ रोजी त्यांना रीडर म्हणून बढतीही देण्यात आली. परंतु निवृत्त झाल्यानंतर
पेन्शन ऍण्ड ग्रॅच्युईटी स्कीमअंतर्गत देण्यात येणारे निवृत्ती वेतन त्यांना
नाकारण्यात आले. ...............................................
बेड्या घातल्यास कच्च्या
कैद्यांनी तक्रार करावी
उच्च न्यायालयाचे निर्देश
मुंबई
, दि.१९ (प्रतिनिधी) - कच्च्या कैद्यांना बेड्या घालून न्यायालयात हजर केले
जात असेल तर त्यांनी संबंधीत न्यायालयातच स्वत:हून तक्रार करावी. प्रत्येक
वेळी आरोपींची चौकशी करणे कनिष्ट न्यायालयाला शक्य नाही. असे मत उच्च
न्यायालयाने व्यक्त केले.कैद्यांना हातात कड्या आणि दोरखंडबांधून न्यायालयात
हजेर केले जात असल्याचा आरोप करणार्या याचिकेवर न्यायमूर्ती शरद बोबडे आणि
न्यायमूर्ती मृदूला भाटकर यांच्या खंडपीठाने हे मत व्यक्त करून याचिका निकाली
काढली....................................

हिवाळी अधिवेशनापूर्वी
सिंचनाची श्वेतपत्रिका
कोणत्याही चौकशीला तयार
मुंबई,
दि. १९ (खास प्रतिनिधी) - आपल्या पक्षाच्या नेत्यांचा माझ्यावर विश्वास आहे.
मी काहीही केलेले नाही. त्यामुळे कोणत्याही चौकशीला सामारे जाण्याची आपली
तयारी आहे असे सांगत जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी हिवाळी अधिवेशनाआधी
सिंचनाची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करू अशी ग्वाही दिली. श्वेतपत्रिकेत
तालुकानिहाय आणि प्रकल्पनिहाय माहिती देण्याची आपली तयारी असल्याचे तटकरे
यांनी सांगितले.सिंचनासंदर्भात विरोधी पक्षाने मांडलेल्या चर्चेत विरोधी
बाकांवरून झालेल्या आरोपांमुळे घायाळ आणि व्यथित झालेल्या तटकरे यांच्या चेहर्यावर
तणाव स्पष्टपणे जाणवत होता. राज्यातील सिंचनक्षमतेत ०.१ टक्का नव्हे तर ५.१७
टक्के वाढ झाल्याचा दावा करताना त्यांनी विविध आकडेवारी सादर केली. राज्यातील
कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र सिंचन महामंडळाच्या क्षेत्रात
एकूण १२ लाख ४७ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आल्याचा दावा त्यांनी केला.....................................
राष्ट्रपतीपदाची निवडणूक
राज्यातून २७४ आमदार आणि ९ खासदारांचे मतदान
मनसे तटस्थ, २ आमदार अनुपस्थित
मुंबई, दि. १९ (खास प्रतिनिधी) - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी
महाराष्ट्रातून एकूण २८३ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यात २७४ आमदार आणि
९ खासदारांचा समावेश आहे. दोन सदस्य अनुपस्थित होते, तर मनसेच्या १२ आमदारांनी
तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात मतदानाची
व्यवस्था करण्यात आली होती...............................................
‘आदर्श’मुळे लष्कराच्या
तळाला धोका नाही
दीपक कपूर यांची अजब साक्ष
आदर्श घोटाळा
मुंबई,
दि. १९ (प्रतिनिधी) - आदर्श गृहनिर्माण संस्थेची इमारत ही लष्करी तळाला लागून
असली तरी ही इमारत या लष्करी तळाच्या सुरक्षिततेला धोकादायक आहे, असे आपल्याला
कधीही वाटले नाही, अशी धक्कादायक साक्ष हिंदुस्थानचे माजी लष्करप्रमुख दीपक
कपूर यांनी आज चौकशी आयोगासमोर दिली. आदर्शसारख्या अनेक गगनचुंबी इमारती या
भागात आहेत. त्यामुळे आदर्शचा लष्करी तळांना धोका निर्माण होईल असा विचार
कधीही आपल्या मनात आला नाही, असेही माजी लष्करप्रमुखांनी सांगितल्याने आयोगाचे
अध्यक्ष जयपाल पाटील आणि सदस्य पी. सुब्रह्मण्यम यांच्या भुवया उंचावल्या......................................
दुबईत हिंदुस्थानी
खाद्यपदार्थांचे विसावे सुपरमार्केट
धनंजय दातार यांची गरुडभरारी
मुंबई,
दि. १९ (प्रतिनिधी) - दुबईत गेली अनेक वर्षे मेहनत व जिद्दीच्या जोरावर यशस्वी
उद्योजक म्हणून नाव कमाविलेले अल अदिल ट्रेडिंग कंपनीचे प्रमुख मसालाकिंग
धनंजय दातार यांनी युनायटेड अरब अमिरातीज (युएई) येथे विसावे सुपरमार्केट सुरू
केले आहे. या मार्केटमध्ये कडधान्ये, डाळींचे विविध प्रकार, मसाले, मसाल्यांचे
पदार्थ आदी हिंदुस्थानी खाद्यमाल ठेवण्यात आले असून त्यास मोठ्या प्रमाणावर
प्रतिसाद मिळत आहे. या आऊटलेटमुळे दुबईतील रहिवाशांना उच्च दर्जाचे
खाद्यपदार्थ मिळणार आहेत......................................................
कामाच्या ताणाने मुंबई
पोलीस ‘बेजार’
- उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, किडनी स्टोन, मनोविकारही
वाढले
- ऍपेक्स रुग्णालयाच्या आरोग्य शिबिरात ‘निदान’
मुंबई,
दि. १९ (प्रतिनिधी) - मुंबईतील पोलीस उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, किडनी स्टोन,
मूळव्याधी तसेच अस्थिव्यंगाच्या समस्यांनी त्रस्त असल्याचे बोरिवलीच्या
ऍपेक्स रुग्णालयाने पोलिसांसाठी घेतलेल्या आरोग्य शिबिरांमध्ये दिसून आले.
इतकेच नव्हे तर कामाच्या दगदगीमुळे पोलिसांवर मानसिक परिणामही होत असल्याचे
आढळले आहे. ऍपेक्स रुग्णालयाने बोरिवली पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांसाठी
घेतलेल्या आरोग्य शिबिरामध्ये पोलिसांना वरील आजार असल्याचे दिसून आले.
बोरिवली पोलीस ठाण्यातील ६५ टक्के कर्मचार्यांना उच्च रक्तदाब आणि उच्च
कोलेस्ट्रॉल असल्याचे दिसून आले. वेळी-अवेळी जेवण, ड्युटीचा त्रास ही यामागची
कारणे आहेत. ..............................................
|