ऑस्ट्रेलियात सत्ताधारी कॉन्झर्व्हेटिव्ह आघाडीला बहुमत

52

सामना ऑनलाईन । मेलबर्न

पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियातील सत्ताधारी कॉन्झर्व्हेटिव्ह आघाडीने सर्वसाधारण निवडणुकीत आश्चर्यकारकरीत्या बहुमत मिळविले. येथील एक्झिट पोलचे अंदाज चुकवत स्कॉट मॉरिसन यांनी पुनरागमन केले आहे. दरम्यान, विरोधी लेबर पार्टीचे नेते यांनी आपला पराभव मान्य करीत पक्षनेतृत्वाचा राजीनामा दिला आहे. ऑस्ट्रेलियात शनिवारी तब्बल 16 दशलक्ष नागरिकांना देशभरातील मतदान केंद्रांवर देशाचा 31वा पंतप्रधान निवडण्यासाठी मतदान केले.  ही निवडणूक ‘पर्यावरणबदल’ या विषयावर झाली. एक्झिट पोलमध्ये लेबर पार्टी विजयी होऊन स्कॉट मॉरिसन यांना पायउतार व्हावे लागेल असा अंदाज वर्तविण्यात आला होता, मात्र प्रत्यक्ष निकालात सर्व अंदाज फोल ठरले.

आपली प्रतिक्रिया द्या