अमेठीत राहुल गांधींच्या पराभवामागे 21 नंबरचे रहस्य

95

सामना ऑनलाईन । अमेठी

रायबरेली आणि अमेठीत काँग्रेसला नेहमीच यश मिळत आले आहे, पण यावेळी भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पराभव दाखवला. अमेठीतील जागेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच राहुल यांनी हार स्वीकारली. त्यांच्या या पराभवामागे 21 या नंबरचे रहस्य आहे.

अमेठी हा मतदारसंघ 1967 मध्ये अस्तित्वात आला. त्यानंतर काँग्रेसला 21 वर्षांच्या अंतराने तीन वेळा अमेठीतून हार पत्करावी लागली आहे. 1998 नंतर राहुल यांना पराभवाचा सामना करावा लागला. रायबरेलीची जागा राखण्यात सोनिया गांधी यशस्वी ठरल्या असल्या तरीही कमी फरकाने त्यांना हा विजय प्राप्त झाला. त्यामुळे काँग्रेससाठी 21 नंबर हा अत्यंत धोकादायक असल्याचेच उघड झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या