उधारीचे पैसे परत मागायला गेला आणि जीव गमावला

सामना ऑनलाईन, नागपूर

कष्टाने कमावलेले आणि उधारी दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा चाकूने वार करून खून करण्यात आला आहे. ही घटना नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली आहे. दर्शिल निमजे असं मृत्यूमुखी पडलेल्या तरूणाचं नाव आहे. तो आणि त्याचा भाऊ मिथून है पैसे परत मागण्यासाठी गेले होते.

पैसे मागायला आल्यानं संतापलेल्या अश्विन बारापात्रे आणि त्याच्या तीन भावांनी मिळून दर्शिल आणि मिथूनवर हल्ला केला होता. खरंतर हा हल्ला मिथूनवर झाला होता, मात्र त्याला वाचवण्याच्या नादात दर्शिलचा बळी गेला. मिथून हा देखील जखमी झाला असून त्याच्यावर मेयो रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मिथूनकडून अश्विव बारापात्रे ५०० रूपये उधार घेतले होते, जे मागण्यासाठी गेलेल्या दर्शिलला जीव गमवावा लागला तर मिथून हा मृत्यूशी संघर्ष करतोय. पोलिसांनी या प्रकरणी अश्विन,निलेश,प्रवीण आणि अजय बारापत्रे यांना अटक केली आहे.