भाजपचे 25 आमदार आमच्या संपर्कात, कमलनाथ सरकारमधील मंत्र्याचा दावा

68

सामना ऑनलाईन । भोपाळ

मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकार अल्पमतात आहे असा दावा भाजपने केला होता. आता भाजपचे 25 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेस नेते आणि मंत्री पीसी शर्मा यांनी केला आहे. तसेच 23 तारखेनंतर ते आमच्याकडे येतील असेही शर्मा म्हणाले.

पीसी शर्मा म्हणाले की, “भाजपचे 25 आमदार आमच्या संपर्कात आहेत. 23 मे रोजी लोकसभेचे निर्णय जाहीर होतील. तेव्हा जर केंद्रात भाजपचे सरकार नाही स्थापन झाले तर ते आमच्या सोबत येतील” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच एक्झिट पोल हे यापूर्वीही खोटे ठरले आहेत. 23 मे रोजी आलेले सर्व एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरतील असे शर्मा म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या