भूकंपाने मेक्सिको गदागदा हालले! २५० ठार, शेकडो जखमी

सामना ऑनलाईन, मेक्सिको

तब्बल ७.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने मेक्सिको शहर अक्षरशः गदागदा हलले. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून किमान २५० जण ठार आणि शेकडो जखमी झाले आहेत. मृतांमध्ये २१ शाळकरी मुले आहेत. इमारतींच्या ढिगाऱयाखाली अनेकजण अडकल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. १२ दिवसांपूर्वीच मेक्सिकोला भूकंपाचा हादरा बसला होता. त्यात १०० जण ठार झाले होते. मात्र, मंगळवारच्या भूकंपाची तीक्रता आणि हानी जास्त आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू टय़ूब्ला प्रांताच्या चिथाअला दी तापिया येथील सात कि.मी.वर आहे. भूकंपाची तीक्रता ७.९ रिश्टर स्केल इतकी मोठी असल्याने अनेक इमारती कोसळल्या. २० लाखांवर नागरिक बेघर झाल्याचे वृत्त आहे. मेक्सिको लष्कर, नौदल, पोलिसांकडून ढिगारे उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. राष्ट्राध्यक्ष निएतो यांनी मृतांची संख्या २५० वर जाण्याची भीती व्यक्त केली. भूकंपामुळे मेक्सिकोची वाताहत झाल्याचे त्यांनी सांगितले. मेक्सिको शहरासह आजूबाजूच्या शहरांनाही हादरा बसला. तेथेही अनेक लोक ढिगाऱयाखाली अडकले आहेत.

भूकंपामुळे शाळा-कॉलेजच्या इमारती कोसळल्या. एका प्रायमरी शाळेची इमारत कोसळल्यामुळे २१ विद्यार्थ्यांसह पाचजण मृत्युमुखी पडले. मेक्सिकोतील आंतरराष्ट्रीय विमानतळासह शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक देशांच्या प्रमुखांनी मेक्सिकोला या आप्तकालीनप्रसंगी मदत देऊ केली आहे.

ज्वालामुखीचा उद्रेक आणि आफ्टर शॉक्स

भूकंपाची तीव्रता एवढी मोठी होती की मेक्सिकोनजीक ज्वालामुखी उसळला. त्यात चर्च कोसळले आणि प्रार्थना करीत असताना १५ जणांचा मृत्यू झाला.

३२ वर्षांपूर्वी याच दिवशी

मेक्सिकोत भूकंपाचा दुर्दैवी योगायोग समोर आला. ३२ वर्षांपूर्वी १९ सप्टेंबर १९८५ ला असाच भूकंप झाला होता. त्यात दहा हजारांवर लोक मृत्युमुखी पडले होते.