कराड-विटा राष्ट्रीय महामार्गासाठी २५३ कोटी, दीड वर्षात काम पूर्ण होणार


सामना प्रतिनिधी । कराड

जुन्या कृष्णा पुलासह कराड – विटा मार्गासाठी 253 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाला लवकरच प्रारंभ होणार असून दीड वर्षात रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर विभागाचे उपअभियंता आर. एस. पन्हाळकर यांनी सांगितले.

दिपक लिमकर, महेश सुतार, अधिक सुर्वे, आनंदराव माने, नितीन आवळे, अनिल कांबळे, प्रशांत यादव हेही यावेळी उपस्थित होते. कराडमधील कोल्हापूर नाक्यापासून जुन्या कृष्णा पुलापर्यंत 120 मीटर डांबरीकरण करण्यात येणार आहे.

कराड कोल्हापूर नाका गांधी पुतळ्यापासुन हे काम करण्यात येणार असून कोल्हापूर नाका ते जुना कृष्णा पूलापर्यंत 2100 मीटर डांबरीकरण करण्यात येणार आहे. कृष्णा पूल ते विटा नागज हा मार्ग काँक्रीटीकरण करण्यात येणार असून त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. तसेच ओगलेवाडी करवडी फाटा ते नागजपर्यंत हा मार्ग तीन पदरी करण्यात येणार आहे.यावेळी या मार्गावर असणारे धोक्याची वळणे काढण्यात येणार आहेत.