राज्यभरात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन, संपाचा २५ वा दिवस

सामना ऑनलाईन, रत्नागिरी

मानधन नको वेतन हवे, मानधनात वाढ झाली पाहीजे अशी मागणी करत राज्यातील अंगणवाडी सेविका  संपावर गेल्या आहेत. ११ सप्टेंबरपासून सुरू झालेलं हे आंदोलन गुरुवारी २५ व्या दिवसात पोहोचलं आहे. रत्नागिरीमध्ये अंगणवाडी सेविकांनी आज जेलभरो आंदोलन केलं.

रत्नागिरी जिल्ह्यात २३०० पेक्षा जास्त अंगणवाड्या आहेत आणि या सगळ्या अंगणवाड्या संपामुळे बंद आहेत. आझाद मैदानावरील मोर्चानंतर सरकारने सेविकांच्या मानधनात १५०० रूपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र या अंगणवाडी सेनिकांना किमान साडेदहा हजार रुपये मानधन मिळायला पाहीजे अशी या सेविकांची मागणी आहे. रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका कृती समितीच्या नेतृत्वात या सेविका एकत्र आल्या होत्या. जिल्हाध्यक्षा संज्योती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली यावेळी जेलभरो आंदोलन करण्यात आलं.