मेक्सिकोतील फटाका बाजाराला लागलेल्या आगीत २६ ठार

सामना ऑनलाईन। मेक्सिको
मेक्सिको शहरातील सगळ्यात मोठ्या फटाका बाजारात मंगळवारी प्रचंड मोठी आग लागली. एका दुकानाला लागलेल्या आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. फटाक्यांचे स्फोटांमागून स्फोट होऊ लागले. यावेळी दुकान संकुलामध्ये अडकलेल्या २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला.

mexico-fire

मेक्सिको शहराच्या उपनगरीय भागातील टुल्टेपॅक येथील सगळ्यात मोठ्या फटाका बाजारात मंगळवारी सायंकाळी ६ वाजता आग लागली तेव्हा ख्रिसमससाठी खरेदीकरण्यासाठी लोकांची फटाका बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली होती.
आगीची बातमी मिळताच अग्निशमन दलाची पथकं घटनास्थळी दाखल झाली. युद्धपातळीवर त्यांनी आग विझवण्याचं काम सुरू केलं. जवानांनी आगीशी तीन तास झुंजत आग आटोक्यात आणली. तोपर्यंत सर्वच्या सर्व दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

mexico-fire-1

दुर्घटना घडली त्यावेळी दुकानाबाहेर ग्राहकांची वाहने उभी होती. शिवाय फटाक्यांच्या दुकानाबाहेरील काही घरांनीही पेट घेतल्याने दुर्घटनेची व्याप्ती वाढली. मेक्सिकोच्या नागरी संरक्षण विभागाच्या प्रमुखांनी दिलेल्या माहीतीनुसार गंभीररित्या भाजलेल्यांची संख्या जास्त आहे. मृतांची संख्या वाढू शकते. रात्री उशीरापर्यंत जखमींना दुकान संकुलामधून बाहेर काढायचे काम सुरू होते