बीड जिल्ह्यात दृष्टीदान उपक्रम पाच महिन्यात 2700  डोळ्याच्या शस्त्रक्रिया

18

सामना प्रतिनिधी । बीड

बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी सामान्य रुग्णासाठी  आरोग्य सुविधा सक्षम केली आहे, बीड च्या खासदार प्रीतमताई मुंडे यांनी जिल्ह्यात डोळ्याच्या शस्त्रक्रिया करण्याचा  उपक्रम आरोग्य खात्यामार्फत राबवण्यास सुरुवात केली, जिल्हारुग्णालयाने दिलेले प्रत्येक उद्दिष्ट सहज पार करण्याचे काम हाती घेतले अवघ्या पाच महिन्यात बीड जिल्ह्यात तब्बल दोन हजार सातशे डोळ्याच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी जिल्हाभरात आरोग्य यंत्रणा सक्षम केली आहे, सामान्य रुग्णाना आधार देण्यासाठी यंत्रणा सज्ज केली आहे, आरोग्य खात्याने दिलेले प्रत्येक उद्दिष्ट सहज पार पाडले जात आहे, वर्षभरात जिल्ह्यात 3500 रुग्णावर डोळ्याच्या शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. अवघ्या पाच महिन्यात सत्तर टक्के शस्त्रक्रिया पार पडल्या. परळी, शिरूर, गेवराई, केज, अंबाजोगाई, तालुक्यातील दोन हजार सातशे रुग्णावर शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टी दिली आहे. अवघ्या पाच महिन्यात उद्दिष्ट पूर्ण झाल्याने उर्वरित सात महिन्यात जास्तीत जास्त रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जाणार असल्याने रुग्णाना मोठा दिलासा मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या