नगरजवळ जातेगाव इथे भीषण अपघात, धुळ्याच्या तिघांचा मृत्यू

10
accident-common-image

सामना ऑनलाईन, नगर

नगर-पुणे महामार्गावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून एक जखमी आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेले तिघेहीजण हे धुळ्याचे रहिवासी आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णायात दाखल करण्यात आले आहे.

पुणेकडून नगरकडे जाणाऱ्या रोडवर  जातेगाव फाट्याजवळ उभ्या असणाऱ्या ट्रक MH 22 AA 524 वर  पाठिमागून आलेल्या स्कॉर्पिओने (MH 18 AJ 8443)  जोराची धडक दिली. पहाटेच्या झोपेत चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.या अपघातामध्ये  ओझायर तसनीय  अख्तर अन्सारी (वय-30 रा.फिरदोस नगर,धुळे), फैसल गुलाब रब्बाली अन्सारी (वय-20 रा.मछली बाजार ,धुळे), इरफान शयशोदोहा अन्सारी (वय-20 रा.मछली बाजार ,धुळे) या तिघांचा मृत्यू झाला तर अदनान निहाल अन्सारी (वय-21रा.तिरंगा चौक ,धुळे) हा जखमी झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या