माजी मंत्री सोळंकेच्या घरी 3 लाखाची चोरी

75

सामना प्रतिनिधी । माजलगाव

माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या केसापुरी शिवारात असलेल्या बंगल्यातुन 3 लाख रुपये चोरी झाले आहेत. या प्रकरणी दोन नोकरांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे.

माजलगाव पासुन जवळच ३ कि.मी. सोळंके यांचा बंगला असून दोन दिवसापुर्वी माजी मंत्री प्रकाश सोळंके व त्यांच्या पत्नी जि.प.सदस्या मंगल सोळंके हे शनिवारी नातेवाईकांच्या लग्नाला गेले होते. त्यांच्या बेडरुम मधील कपाटात ठेवलेले ३ लाख रुपये चोरी गेल्याची खात्री झाल्याने प्रकाश सोळंके यांचे पुत्र वीरेंद्र सोळंके यांनी ठाण्यात नोकरासह स्वयंपाकी महिलेस सोमवारी पोलिसांच्या ताब्यात दिले. सायंकाळपासून पोलिसांनी कसुन चौकशी केल्यावर या दोन्ही नोकरांनी चोरीची कबुली दिली नाही. या प्रकरणी रात्री उशिरा पर्यंत कसलाही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

आपली प्रतिक्रिया द्या