डहाणूत दोन बाईकची टक्कर; तिघांचा मृत्यू

16
accident-common-image


सामना प्रतिनिधी । वाणगाव

चारोटी-डहाणू रोडवरील सारणी येथे आज रात्री दोन बाईकची समोरासमोर टक्कर होऊन तीन जण ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झाले. ठार झालेल्यांमध्ये शिंगडा दांपत्य व एका दुचाकीस्वाराचा समावेश आहे. रक्षाबंधननंतर घरी जाताना या कुटुंबावर काळाने घाला घातला असून या अपघातातील दोघा जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

रात्री 8.30च्या सुमारास हा अपघात झाला. उर्से येथे राहणारे स्वप्नील शिंगडा (28) हे पत्नी शर्मिला शिंगडा (24) व तीन वर्षीय मुलगा आरुष शिंगडासह रक्षाबंधनासाठी कोंडगाव येथे आज गेले होते. रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटोपून दुचाकीवरून घरी जात असताना चारोटी-डहाणू रोडवरील सारणी येथे समोरून येणाऱ्या बाईकची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात स्वप्नील, शर्मिला हे दांपत्य जागीच ठार झाले. तर त्यांचा मुलगा आरुष (3) हा गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. मनोज गुहे (28) हा दुचाकीस्वारही ठार झाला असून त्याची मुलगी मानवी (4) हीदेखील जखमी झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या