श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, 3 नागरिक जखमी

1
shrinagar-terror-attacked

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरमध्ये हिंदुस्थानी लष्कराच्या सतत सुरू असलेल्या कारवायांनंतर देखील दहशतवादी हल्ले थांबण्याचे नाव नाही. आज दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील झिरो ब्रिजवर असलेल्या जवानांच्या पथकावर हल्ला केला. या हल्ल्यावेळी तिथे काही नागरिक देखील होते. त्यामुळे ग्रेनेड हल्ल्यात तीन नागरिक जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.