गुरेज सेक्टरमध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा

2

सामना ऑनलाईन । बांदीपोरा

जम्मू-कश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातल्या गुरेज सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ३ दहशतवाद्यांना हिंदुस्थानच्या जवानांनी ठार केले. आणखी कोणी दहशतवादी लपले आहेत की नाही याची खात्री करुन घेण्यासाठी गुरेजमध्ये जवानांनी शोध मोहिमेला सुरुवात केली आहे.

हिंदुस्थानी जवानांनी यंदा १ जानेवारी पासून आतापर्यंत घुसखोरीचे २२ प्रयत्न हाणून पाडले असून ३८ सशस्त्र दहशतवाद्यांना घुसखोरी करत असताना ठार केले आहे. दहशतवाद्यांचे घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमा या ठिकाणी गस्त वाढवण्यात आली आहे.