आयटी रिटर्न भरला नसेल, तर आजच भरा!

सामना ऑनलाईन । मुंबई
ज्या करदात्यांनी अद्याप प्राप्तिकर विवरणपत्र भरलं नसेल त्यांनी आजच तो भरावा. प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी ३१ जुलै शेवटची मुदत आहेत. त्यामुळे करदात्यांनी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी एकच घाई केली आहे. मात्र नोटबंदी आणि जीएसटीमुळे हिशेब देण्यास करदात्यांना उशीर होत आहे. त्यामुळे सरकारनं रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, असं करदात्यांचं म्हणणं आहे. मात्र मुदत वाढ देणार नसल्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे.
विवरणपत्र भरणे सोपे जावे यासाठी करदात्यांनी http://incometaxindiaefiling.gov.in या वेबसाइटवरून विवरणपत्र भरावे, असे आवाहन सरकारने केले आहे. आयकर विभागाकडे इलेक्ट्रॉनिकली फाइल झालेले दोन कोटी रिटर्न आतापर्यंत आले आहेत. ई-फायईलिंग वेबसाईटवर काही समस्या आल्याची माहिती समोर येत होती. मात्र या वेबसाईटला कोणतीही मोठी समस्या निर्माण झाली नव्हती. काही वेळ ही साईट डाऊन झाली होती, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.