ताजिकिस्तानातील तुरुंगात कैद्यांची दंगल, 32 ठार

8

सामना प्रतिनिधीदुशानबे

ताजिकिस्तानातील तुरुंगात रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण दंगलीत 32 जण ठार झाल्याची माहिती प्रशासनाने आज दिली. या दंगलीत इस्लामिक स्टेट दहशतवादी संघटनेचे कैदेत असलेले 24 दहशतवादी, तीन सुरक्षारक्षक आणि अन्य पाच कैदी ठार झाले आहेत. ताजिकिस्तानची राजधानी दुशानबे शहरापासून 17 किलोमीटर अंतरावर वाखदात येथे तुरुंग असून तेथे 1500 कैद्यांना ठेवले आहे. रविवारी सायंकाळी इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी सामूहिक पलायन करण्यासाठी ही दंगल घडवून आणल्याचे सूत्रांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या