तैवानमध्ये पर्यटकांच्या बसला भीषण अपघात, ३४ ठार

सामना ऑनलाईन। तैपेई

तैवानमध्ये पर्यटकांच्या बसला झालेल्या भीषण अपघातात ३४ जण ठार अणि १२ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दहा जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.या बसमध्ये ४६ जण होते.

हे सर्व पर्यटक सोमवारी संध्याकाळी चेरी ब्लॉसम शेत पाहून परतत होते. यावेळी चालकाचे बसवरिल नियंत्रण सुटले आणि बस हायवेवरुन खाली जाणारया रस्त्यावर कोसळली. गेल्या ३० वर्षातला तैवानमधील हा सर्वात भीषण अपघात आहे.

ताईचुंग प्रांतात हिवाळ्यात चेरी ब्लॉसमची फुले येतात. ही फुल बघण्यासाठी दरवर्षी शेकडो पर्यटक तैवानमध्ये येतात. सोमवारी चेरी ब्लॉसमची शेती बघून पर्यटक बसमधून परतत होते. त्याचवेळी तैपई हायवे मोकळा असल्याने चालकाने बसचा वेग वाढवला. यात चालकाचे बसवरिल नियंत्रण सुटल्याने बस हायवेच्या कठड्याला आदळून खालून जाणारया रस्त्यावर कोसळली. यात ३४ जण जागीच ठार झाले आहेत. तर १२ जण जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता कि बस खाली कोसळताच त्याचे छत फाटले व आतील प्रवासी सीटसह बाहेर फेकले गेले.