दहशतवादी हल्ल्यात 35 सैनिक ठार

प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । काबूल

अफगाणिस्तानच्या फराहा प्रांतात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अफगाण लष्कराचे ३५ सैनिक ठार झाले आहेत. तालिबान या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. गुरुवारी रात्री दहशतवाद्यांनी फराह प्रांतातील शेवानी, अरब खोरमाय, गरानी या भागातील लष्कराच्या चौक्यांवर हल्ले केले. अद्याप या ठिकाणी दहशतवादी व सैनिकांमध्ये चकमक सुरू असल्याचे समजते.