‘पानिपत’मध्ये संजय घालणार 35 किलोचे कवच

5

सामना ऑनलाईन, मुंबई

आशुतोष गोवारीकरच्या आगामी ‘पानिपत’ या चित्रपटात संजय दत्त तब्बल 35 किलो वजनाचे कवच घालणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग सध्या जयपूर येथे सुरू असून चित्रपटात संजूबाबा अफगाण किंग अहमद शाह दुर्रानीची भूमिका साकारत आहे.

35 किलो वजनाच्या या कवचात फिट बसण्यासाठी संजय सध्या खूपच मेहनत घेताना दिसत आहे. शूटिंगदरम्यान मोकळा वेळ मिळताच संजय जिममध्ये वर्कआऊट करतो. त्यासाठी सेटच्या बाजूलाच खास जिम तयार करण्यात आली आहे. या जिममध्ये संजयने मुंबईहून स्वतःचे खासगी इक्विपमेंटदेखील आणले आहेत. संजयसोबतच या जिमचा वापर अन्य कास्ट आणि क्रू मेंबर्सदेखील करतात. या चित्रपटात संजयसोबतच अर्जुन कपूर, कृति सैनन, पद्मिनी कोल्हापुरे, मोहनीश बहल प्रमुख भूमिकेत आहेत.